दोन महिन्या पूर्वी मृत्यू पावलेल्या मुलीच्या प्रेताचे बाळापूर पोलीसांनी केले जागेवरच शव विच्छेदन

733
जाहिरात

बाळापुर शहरात एकच खळबळ

अकोला(प्रतिनीधी)
बाळापूर शहरातील जवळी वेस भागात राहणाऱ्या एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा 9।3।19 रोजी मृत्यू झाला होता .मात्र हा मृत्यु नैसर्गिक होता की या मृत्युमागं काही वेगळी काहाणी आहे याचा तपास करण्यासाठी बाळापुर पोलीसांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीने दोन महीने पुर्विच्या मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन केले.या घटनेने बाळापुर शहरात एकच खळबळ उडाली होती.

पोलीस सुत्रानुसार दोन महीन्यापुर्वी मृत्यु झालेल्या या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे आई, वडील व नातेवाईकांनी . अंतिम संस्कार सुद्धा केले होते, त्या नंतर 20।3।19 रोजी पोलिस स्टेशन बाळापूर येथे एक निनावी अर्ज प्राप्त झाला त्या मध्ये मुलीच्या मृत्यू बाबत संशय व्यक्त करून मुलीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असून तिचे नातेवाईकांनी बदनामी होऊ नये म्हणून नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासविले व पोलिस स्टेशनला कोणतीही तक्रार न देता अंतिम संस्कार उरकून घेतले, त्या नंतर 24।3।19 ला बाळापूर शहरातीलच इलियास अहमद अब्दुल सादिक कुरेशी ह्यांनी ह्याच आशयाची लेखी तक्रार देऊन चौकशीची मागणी केली होती, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेऊन तात्काळ चौकशी सुरू केली परंतु मृत मुलीचे वडील, नातेवाईक, प्रत्यक्ष दर्शी, अंतिम संस्कारात सामील लोकांचे जबाब बाळापूर पोलिसांनी नोंदविले असता, सर्वांनी मुलीचा मृत्यू नैसर्गिक असून तिचे मृत्यू मध्ये संशय नसल्याचे सांगितले, त्या नंतर मा उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती, ह्या प्रकरणाचा पारदर्शक तपास व्हावा म्हणून पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी ह्यांनी बारकाईने तपास करून पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी ह्यांनी स्वतः सरकार तर्फे फिर्यादी होऊन ह्या प्रकरणी 1।5।19 ला पोलीस स्टेशन बाळापूर येथे अकस्मात मृत्यू चा गुन्हा दाखल करून उपविभागीय अधिकारी बाळापूर ह्यांची लेखी परवानगी घेऊन आज 5।5।19 रोजी सदर अल्पवयीन मुलीचे 2 महिन्या पूर्वी अंतिम संस्कार करून गाडण्यात आलेले प्रेत कबरीतून बाहेर काढून जागेवरच डॉक्टर सचिन गाडगे, डॉक्टर कुलकर्णी व त्यांचे चमूने निवासी नायब तहसीलदार कोठेकर व सरकारी पंचा समक्ष प्रेताचे शव विच्छेदन करण्यात आले. ह्या वेळी पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. बाळापूर शहराचे ईतिहास मध्ये कबरी मधून प्रेत बाहेर काढून शव विच्छेदन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने बाळापूर शहरात अफवांचे पीक भरपूर होते, परंतु पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी कुशलतेने परिस्थिती हाताळल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मृत्यूचे निश्चित कारण समजल्यावर पुढील तपास पोलीस अधीक्षक राकेश कला सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन शेळके, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, सुरेंद्र जोशी, हर्षल श्रीवास, राठोड हे करीत आहेत