पोलीस निरिक्षक बी. जी.वेव्हळ यांनी तेरच्या सेवानिव्रत पोलीसावर केला गुन्हा दाखल

0
1321

पोलीस निरिक्षक बी. जी.वेव्हळ यांनी तेरच्या सेवानिव्रत पोलीसावर केला गुन्हा दाखल

उस्मानाबाद – उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ऐका सेवानिव्रत पोलीस हेड काँन्स्टेबल ने शासकीय कामात अडथळा केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधीक माहिती अशी की उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील संत गोरोबा काकांची यात्रा सुरु आहे.ता ५/५/२०१९ (रविवारी) यात्रेच्या बंदोबस्तासाठी ढोकी येथील पोलीस निरिक्षक बि जी वेव्हळ हे रात्री ९ ते १० वाजण्याच्या सुमारास आपल्या कर्मचार्यांना घेऊन यात्रेत पाहणी करुन तेर येथील ग्रामपंचायतने यात्रेत केलेल्या संपर्क कार्यालयासमोर पोलीस कर्मचार्यासोबत यांच्यासोबत बंदोबस्ताच्या नियोजनाबाबत चर्चा करत असताना तेथे अचानक तेर येथील सेवानिव्रत पोलीस हेड काँन्स्टेबल रतन नाईकवाडी हे त्या ठिकाणी आले व त्यांनी पोलीसांना आरेरावीची भाषा करून पोलीस निरिक्षक बी. जी .वेव्हळ यांची काँलर पकडून अंगावर धावून आला एका पोलीस व पोलीस नाईक शेळके यांच्या आवघड ठिकाणावर लाथ मारली.यापूर्वीही चार दिवसापूर्वी नाईकवाडी यांनी तेर येथील यात्रेत अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.अशी माहीती पोलीस निरीक्षक बी. जी.वेव्हळ यांनी दिली.घटनेच्या नंतर ढोकी पोलीस ठाण्यात रतन नाईकवाडी यांच्या विरोधात पोलीस निरिक्षक बी जी वेव्हळ यांनी फिर्याद दिली यात कलम 353,332,114,323,504,506 भादवी प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सदर प्रकारणात गुन्हा दाखल झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सेवानिव्रत पोलिसावर गुन्हा दाखल झाल्यामुळे यात्रेत टवाळखोरी करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.या प्रकरणाचा तपास ढोकी ठाण्याचे पोलीस करत आहेत.

*टवाळखोरी व गुंडगीरी करणार्यांच्या मुसक्या आवळणार*

याबाबत ढोकी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधीकारी पोलिस निरिक्षक बी. जी .वेव्हळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की तेर येथे यात्रा सुरु आहे मी यात्रेत पोलीसांच्या बंदोबस्ताची पाहणी करत असताना तेर येथील रतन नाईकवाडी हे आले व आमच्या कर्मचार्याला त्याने लाथ मारली त्याने आमच्या शासकीय कामात अडथळा केला त्यामुळे त्याच्या विरुद्ध रितसर तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.यापूढे जर कोणी टवाळखोरी किंवा सार्वजनिक ठिकाणी अशांतता निर्माण केली तर आम्ही कार्यवाही करून त्यांच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता मुसक्या आवळू असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले.