सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात किसनराव हुंडीवाले यांचा निर्घृण खून- डोक्यावर अग्निशामक च्या लहान सिलेंडर ने मारहाण

0
1662
Google search engine
Google search engine

अकोला ब्रेकिंग:-

अकोल्यातील गजबजलेल्या अशोक वाटिका चौकातल्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात  ब्रोकर किसनराव हुंडीवाले आपल्या काही काही कामानिमित्त आले होते दरम्यान काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात यांचा जागीच मृत्यू झालेला आहे.

शिक्षण संस्थेच्या मालकी वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे.

सदर घटना अकोल्यात वाऱ्यासारखी पसरल्याने खळबळ निर्माण झाली, हुंडीवालेे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय आपल्या कामानिमित्त उपस्थित असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर अग्निशामकचे छोटे सिलेंडर मारले हा मार इतका जोरदार होता की यांचा जागेवरच मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, शहर उपविभागीय अधिकारी उमेश माने, ठाणेदार विनोद ठाकरे एलसीबी पोलीस निरीक्षक कैलास नागरे घटनास्थळावर पोहोचले .