भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव साजरा

0
912
Google search engine
Google search engine

विविध समाजयोपयोगि कामांनी साजरी केली भगवान परशुराम जन्मोत्सव !!

भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव संत नगरी शेगांव मधे विविध समाज उपयोगी कामांनी मोठ्या उत्साहाने आणि भक्ति भावाने साजरी करण्यात आली
अखिलभारतीय ब्राह्मण महासंघ श्री मारवाडि हितैषी मंडळ मारवाडी ब्राह्मण युवक मंडळ महाराष्ट्रीयन ब्राह्मण सभा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत नगरी शेगांव मधे दरवर्षि प्रमाणे यंदाही भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला मारवाडी महिला मंडळ द्वारा विविध स्पर्धांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते यामधे मुलांसाठी ड्राईंग स्पर्धा ,जनरल नाँलेज स्पर्धा युवतीसाठी केक सजावा स्पर्धा धान्य सजवा स्पर्धा वेशभुषा स्पर्धा डान्स स्पर्धा तसेच युवकांनी रक्तदान आणी अन्नदान व मोटर सायकल रँली काढून उत्सवात सहभाग घेतला या उत्सवात सुंदरकांड वाचून धार्मीक विधी सुध्दा केले तसेच दरवर्षि प्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा भगवान परशुराम यांच्या भव्य मुर्तीची काढण्यात आली हि शोभायात्रा परशुराम भवन भैरव चौक आठवडी बाजार बसस्टँन्ड मेन रोड गांधी चौक खेतान चौकातून परशूराम भवन मधे परत गेली तेथे भगवान परशुरामांची आरतीव पुजा करण्यात आली तसेच स्पर्धतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले क्रुष्णा काँटेज येथे महाप्रसाद वितरण होऊन उत्सवाची सांगता झाली याउत्सवात शेगांव मधील ब्राह्मण समाज मोठ्या संखेने सहभागि झाला होता