पाकिस्तानातील दर्ग्यात बॉम्बस्फोट

200

पाकिस्तानातील लाहोरमध्ये सूफी पंथीयांच्या धार्मिक स्थळावर बॉम्बस्फोट.

बुधवार (दि.8) रोजी सुफी दर्ग्यातील दाता दरबारबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनात हा स्फोट झाला. यामध्ये 9 जण ठार झाले असून, मृतांमध्ये पाच पोलिसांचा समावेश आहे. या स्फोटात 24 जण जखमी झाले असून, यातील 8 जणांची परिस्थीती अत्यंत गंभीर आहे.

जखमींना तातडीने उपचारासाठी मायो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, हा बॉम्बहल्ला कोणी घडवून आणला याचा पोलीस शोध घेत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।