आमदार राणादादांच्या ऊसाला ग्रामपंचायतचं पाणी ?

2516

आमदार राणादादांच्या ऊसाला ग्रामपंचायतचं पाणी ?

उस्मानाबाद / प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायतने केलेल्या पाणीसाठ्याचा ऊपसा हे आमदार राणाजजितसिंह पाटील जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या कुटूंबातील शेतातील ऊसाला पाणी देत असल्याची तक्रार पालकमंत्री आर्जून खोतकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील संत गोरोबा काकांच्या मंदिराच्या पाठिमागे तेरणा नदिपात्रात दोन खड्डे आहेत त्यापैकी एका खड्यात ग्रामपंचायतने पाणिसाठा केलेला आहे .त्याच्या जवळच आमदार राणाजजितसिंह पाटिल यांच्या कुटूंबातील ऊसाला पाणी देण्यासाठी एक खड्डा घेतला आहे.ग्रामपंचायतच्या खड्यात साचलेले पाणी हे पाटिल यांच्या खड्यात चारी मारुन घेतल्याची चर्चा आहे.
सध्या दुष्काळी परस्थीती असल्यामुळे तेर येथील समाजसेवक महादेव खटावकर यांनी दिनांक ७ मे २०१९ रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आर्जून खोतकर यांना लेखी निवेदन दिले आहे .निवेदनात आमदार राणाजजितसिंह पाटिल व जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या दबावामुळे आधीकारी कार्यवाही करत नाहीत.तर हा खुलेआम पाणी ऊपसा हा ग्रामपंचायतच्या संगनमताने करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी आधीकारी यांना देण्यात आली आहे.या तक्रारीची चर्चा उस्मानाबाद जिल्हायात मोठ्या प्रमाणात आता सुरु झाली आहे खरे पण यावर आता प्रशासन कार्यवाही करणार का ? दबावाला बळी पडणार याकडे तेरकरांसह जिल्ह्याते लक्ष लागले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।