अकोट मेडिकल असो.क्रिकेट संघाच्या वतीने पिच्यांक सिल्याट राष्ट्रिय स्पर्धेसाठी आर्थिक मदत

464

अकोट ता.प्रतीनिधी
अकोट मेडिकल असोसिएशन क्रिकेट संघा च्या वतीने तालुक्यातील अकोलखेड येथिल कु पूनम तेल्हारकर हिला भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय पिच्यांक सिल्याट स्पर्धेसाठी आर्थिक मदत करण्यात आली.या स्पर्धेसाठी तीची महाराष्ट्राच्या संघात निडव झाल्या बद्दल यावेळी मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष अमोल वसू सचिव नैमिश सेजपाल तसेच संजय पवार डीक्कर ,पठाण यांच्या उपस्थितीत कु पूनम हिला १० हजार रुपयांचा धनादेश देऊन मदत करण्यात आली.

पुनम हीच्या घरची परीस्थीती नाजुक असुन तिचे आई वडील हे मजुरी करतात.अश्या प्रतिकुल परीस्थीततल्या पुनमला आर्थीक बाबीमुळं अनेक अडचणी येत होत्या.या आर्थीक मदतीमुळं तीला राष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे नवे बळ मिळाले. याआधीही तीने राज्य पातळीवर अनेक बक्षिसे पटकावली आहेत.याप्रसंगी पिच्यांक सिल्याट असोसिएशन चे अध्यक्ष रवींद्र मालखेडे व सचिव तथा प्रशिक्षक आकाश धुमाळे यांनी मेडिकल असोसिएशन चे आभार मानले. या मदतीने ग्रामीण भागातील प्रतिभावान, गरीब व होतकरू विद्यार्थीना पुढे येण्यास मदत झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत असुन अकोट मेडिकल असोसीएशन क्रिकेट संघाच्या पदाधीकारींचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।