बुलढाणा जिल्हा शिक्षक महासंघाची सहविचार सभा संपन्न

0
883
Google search engine
Google search engine

बुलढाणा :-शेख इम्रान

आज दिनांक 8 मे 2019 श्री शिवाजी विद्यालय बुलढाणा याठिकाणी मा. शेखर भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक महासंघाची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती . या सभेला बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर लाेणार, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा ,चिखली बुलढाणा ,खामगाव, शेगाव ,नांदुरा, संग्रामपूर मलकापूर ,जळगाव जामोद संपूर्ण तालुक्यातील शिक्षक महासंघाच्या कार्यकारणीचे सभासद त्यासोबत असंख्य शिक्षक वृंद उपस्थित होते 30 एप्रिल 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जुनी पेन्शन च्या संदर्भात दिलेला विरोधातील निर्णय या दृष्टिकोनातून या सभेचे आयोजन करण्यात आले होते. जुनी पेन्शन ही शिक्षकाच्या हक्काची आहे आणि ही त्यांना मिळालीच पाहिजे त्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा लढा उभारण्यासाठी मा. शेखर भोयर यांनी आपले मत व्यक्त केले कारण पेन्शन शिवाय कर्मचाऱ्याचे निवृत्ती नंतरचे जीवन हे हलाखीचं होते .त्यामुळे त्याचा उत्पन्नाचा स्रोत हा कायम राहावा व भविष्यातील आयुष्याला आनंदानं जगता यावे हा त्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. म्हणून भाऊच्या या लढ्याला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी असंख्य शिक्षक वृंद मोठ्या उत्साहाने याठिकाणी उपस्थित होते त्या वेळेला अनेक शिक्षकांनी जुन्या पेन्शनच्या संदर्भांमध्ये आपली मतं मांडली तसेच जुनी पेन्शन योजना ही शेखर भाऊ आम्हाला मिळवून देऊ शकतात असा विश्वासही यावेळी अनेक शिक्षकांनी बोलताना व्यक्त केला त्यानंतर शेखर भोयर यांनी सभेला मार्गदर्शन करताना सांगितले की आता न्यायालयीन लढाई लढावी लागेल परंतु त्याआधी आपण रस्त्यावरची लढाई आणि सभागृहातील लढाईत आपल्या ला लढायची आहे आणि त्यासाठी सभागृह बंद पडण्याची वेळ आली तर सभागृहातील अनेक आमदारांना सोबत घेऊन त्यांच्या सहकार्याने त्यामध्ये प्रामुख्याने
विरोधी पक्ष नेते मा,धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात व सहकार्याने सभागृहातील शिक्षक आमदार कपिल पाटील, विक्रम काळे, सतीश चव्हाण यांच्या सहकार्याने सभागृह बंद पाडण्याची जरी वेळ आली तरी ते आम्ही केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारचा आशावाद या सभेला संबोधित करताना शेखर भाऊंनी सर्व शिक्षकांना सांगितले की जोपर्यंत तुम्हाला जुनी पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही कारण निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याचा आधार म्हणजे पेन्शन आहे तसेच इयत्ता पाचवी व आठवीचा वर्ग ज्या ठिकाणी नियम बाहेर जोडलेला वर्ग आहे ,त्या संदर्भामध्ये भाऊंनी 7 मे 2019 रोजी शिक्षण संचालनालय कार्यालय पुणे यांच्याकडून नियमबाह्य वर्ग बंद करण्यासंदर्भात चे पत्र यावेळी सर्व शिक्षकांना देण्यात आले त्यामुळे ज्या ठिकाणी पाचवी व आठवी वर्ग नियम बाह्य जोडलेले आहे आणि त्यामुळे काही शिक्षकांना अतिरिक्त होण्याची वेळ आली होती आता त्यांना दिलासा मिळाला, असल्यामुळे यावेळी अनेक शिक्षकांनी भाऊंचे मोठ्या प्रमाणावर आभार मानले या सहविचार सभेमध्ये अनेक प्रश्न शिक्षकांनी विचारलेले भाऊंनी त्या प्रश्नांचे उत्तर देऊन शिक्षकांचे समाधान केले आणि तुमच्या कुठल्याही समस्या असल्या तर मला फोनवर सांगितले तरी चालेल तुम्ही तुमची शाळा सांभाळा आणि तुमचे सगळे तुमचे टेन्शन मला द्या तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावेल अशा प्रकारचा आशावाद याप्रसंगी भाऊंनी सर्व शिक्षकांना दिला या सभेला शिवाजी विद्यालयातील सभागृह संपूर्णपणे भरलेले होते त्यावेळेस सभासद नोंदणी सुद्धा करण्यात आली शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सभासद नोंदणी करून घेतली त्यानंतर शेखर भाऊंनी शिक्षणाधिकारी कार्यालय येथे जाऊन अनेक शिक्षकांच्या विविध प्रश्नावर ती मा, शिक्षणाधिकारी पानझाडे साहेब यांच्याशी चर्चा केली त्यांना निवेदन दिले त्यानंतर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राठोड मॅडम यांच्याशी चर्चा करून आश्रम शाळेतील कर्मचार्‍यांचे पगार एक तारखेलाच करण्यात यावेत अशा प्रकारचा आग्रह धरला व त्यांच्या संदर्भात सुद्धा लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारचा आग्रह त्यांनी धरला त्यानंतर लेखा अधिकारी कार्यालय येथे जाऊन मीनाक्षी पवार मॅडम यांच्याशी त्यांनी विविध प्रश्नावर ती चर्चा केली व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडविण्यासाठी कार्यवाही करावी अशा प्रकारचे निवेदन पवार मॅडम यांना देण्यात आले
वेतन अधिक्षक कार्यालय बुलढाणा याठिकाणी बहुसंख्य शिक्षक आपल्या समस्या घेऊन या दालनांमध्ये उपस्थित होते त्यामध्ये 2012 पासून च्या थकीत प्रश्न त्या संदर्भातला प्रश्न थकीत मेडिकल बिले वरिष्ठ वेतन श्रेणी थकीत बिले यासंदर्भात श्री मनवर साहेब अधीक्षक यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर निकाली काढल्या जातील अशा पद्धतीचा शब्द श्री मनोह साहेब यांच्या कडून घेण्यात आला या संपूर्ण सभेला असंख्य शिक्षक मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग सुद्धा या ठिकाणी दिसून आला
सदर सभेमध्ये शिक्षक महासंघाचे संपूर्ण पदाधिकारी याठिकाणी उपस्थित होते मंचकावर मार्गदर्शक श्री मा, शेखर भोयर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आनंद रावजी वानखेडे जिल्हाध्यक्ष बुलढाणा विभागीय संघटक आत्मानंद थोरहाते सर सुनील भाऊ सपकाळ सर जिल्हा अध्यक्ष श्री दिलीपराव दांदडे सचिव श्री नेमाडे सर डॉ, सांगळे सर त्याचबरोबर उर्दू सेल जिल्हाध्यक्ष आनिस सर सदर कार्यक्रमाला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री सदानंद मोरे सर ज्ञानेश्वर शेळके सर श्री सीताफळे सर अविनाश पाटील सर प्रा, समाधान वाघ सर प्रा, धंदर सर हा देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष अविनाश कांयदे सर चिखली तालुका अध्यक्ष काकड सर नांदुरा तालुका अध्यक्ष अबघड सर मेहकर तालुका अध्यक्ष नितीन दादा पाटील सर यांच्याबरोबर आपापल्या तालुक्यातून पदाधिकाऱ्यांसह प्रत्येकी तीस चाळीस लोकांचा समूहाने जवळपास याठिकाणी 400 ते 500 शिक्षकवृंद सभेला उपस्थित होते सदर सभेचे सूत्रसंचालन अतिशय मनमोहक पणे व प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालणारे असं वकृत्व असणारे आमचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री गजेंद्र सिंग राजपूत सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री दिलीप दांदडे सर यांनी मानले