गोशाळांचे अनुदानाचे प्रस्ताव तातडीने पाठवा:- आमदार डॉ. अनिल बोंडे यांची मागणी

0
612

 

विशेष प्रतिनिधी:-

अमरावती जिल्ह्यामधील दुष्काळी परिस्थितीमध्ये गोशाळा चालविणे अतिशय कठीण झालेले आहे. रोज पोलीस कर्मचाऱ्याद्वारे पकडण्यात आलेली जनावरांची या गोशाळामध्ये सातत्याने वाढ होत आहे. या गोवंशाचे पालन करण्याकरिता गोशाळांना चाऱ्यासाठी मदत करण्याचा प्रस्ताव तातडीने शासनाला पाठविण्याची मागणी आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी यांना गोशाळा संचालकाचा वतीने केली.मा. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पशु विकास विभागाद्वारे मदत पुनर्वसन खात्याला तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले

 

गोवंशाचे रक्षण वं पालन करण्याकरिता समाजसेवी संस्थाद्वारे अमरावती जिल्ह्यामध्ये ३० गोशाळा कार्यरत आहेत. या गोशाळामध्ये ५५०० गोधनाचे पालन पोषण होत आहे. मध्यप्रदेशामधून येणारे गायी, वासरे, पोलिसाकडून पकडण्यात आलेले बैल, गायी, अनिमल कृयोलीटी कायद्या अंतर्गत जप्त केलेली जनावरे, बेवरस जनावरे यांना आश्रय या गोशाळामध्येच मिळतो त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी गोशाळा संचालकांनी केली.

गोशाळामध्ये असलेली गायी बैलांचे टगिंग, औषधी, जंतनाशक उपचार पशुखात्याने तातडीने करण्यात असेही निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले

या बैठकीला माधवदास महाराज गौरक्षण संस्था, केकतपूर. विजय शर्मा, श्री गोरक्षण संस्था, अमरावती ओमप्रकाश लढ्ढा, शामभैया, श्री गौरक्षण संस्था रिद्धपूर, संतोष ठाकरे, गोकुलम गौरक्षण संस्था, अभिषेख मुरके, महर्षी गोरक्षण संस्था ललित पवार, शिवशक्ती गोरक्षण संस्था, माहुली अमोल कथलकर विश्वहिंदू परिषद महानगर गौरक्षा प्रमुख मयूर सोनी, बजरंग दल गौरक्षा प्रमुख ललित ठाकूर व इत्यादी गोपालक या बैठकीला उपस्थित होते तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती खात्री मडम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ नितीन व्यवहारे, सह. आयुक्त डॉ गोहत्रे वरुड तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गिरी, मोर्शी तालुका पशुसंवर्धन अधिकारी, डॉ पुरी, उपविभागीय कृषी अधिकारी श्री सातपुते जिप सदस्य श्री संजय घुलक्षे, श्री बाळूभाऊ मुरुमकर, श्री संजय आकोलकर या बैठकीला उपस्थित होते.