दर्यापुर :-  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई बोर्ड) घेतलेल्या दहावीचा परीक्षेच्या निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये दर्यापूर येथील एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्स शाळेने मोठे यश संपादन केले आहे. शाळेतील  ४ विद्यार्थी मेरीट लिस्ट मध्ये आले आहेत तर शाळेचा निकाल  शंभर टक्के लागला आहे.
               कु वेदांती वडतकर हिने  (९६%) घेवून प्रथम नंबर पटकावला तर पराग गुरव याने  (९४%) गुण प्राप्त करून द्वितीय नंबर मिळवला आहे तसेच  सुजल चांडक आणि आदित्य टोळे यांनी प्रत्येकी  ९१ % घेवून त्रितीय नंबर प्राप्त केला.
                      वेदांती वडतकर इंग्रजी विषयात ९६ गुण घेवून प्रथम, वेदांती वडतकर हिंदी विषयात ९८ गुण घेवून प्रथम,  सुजल चांडक गणित विषयात  ९५ गुण घेवून प्रथम, वेदांती वडतकर सायन्स विषयात ९५ गुण घेवून प्रथम, वेदांती वडतकर सामाजिक शास्त्र विषयात ९७ गुण घेवून प्रथम आली.
               सदर शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे १०० टक्के लागला. ज्यामध्ये ९० टक्के च्या वर पाच विद्यार्थी, ८० टक्के च्यावर तेरा विद्यार्थी तर ७० टक्के च्या वर १४ विद्यार्थी व ६० टक्के च्या वर पांच विद्यार्थी आलेत.
            विद्यार्थ्यांचे शाळांचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भट्टड, उपाध्यक्ष डॉ.विष्णुजी भारंबे , सचिव श्री.दिलीप पखान, सह-सचिव सौ.पूनम पनपालिया , सदस्य श्री. अतुल मेघे , प्राचार्य श्री.तुषार चव्हाण., उप-प्राचार्य श्री.राजेंद्र तटस्कर यांनी कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय शाळांचे प्रशासक, प्राचार्य तसेच शिक्षक वृन्दांना दिले.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।