पावसाळ्यापुर्वी येवदा येथील लेंडी नाल्याची साफसफाईची प्रहारची मागणी ……

114

येवदा  ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष..

प्रतिनिधी / येवदा –
दर्यापुर तालुक्यातील ग्राम येवदा गावातून वाहत असलेल्या लेंडी नाल्यात काटेरी झाडे, झुडपे फार मोठ्या प्रमाणात  असल्याने तसेच परिसरात शेणखतांचे ढिगारे साचले असल्याने गावातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत प्रहारचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदिप वडतकर यांनी येवद्याचे ग्रामविकास अधिकारी, राजेंद्र चौखंडे यांना निवेदन सादर करुन लेंडी नाल्यात काटेरी झाडे,झुडपे त्वरित तोडून सफासफाई करण्याची मागणी केली आहे होती, त्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासनाने तात्तपुरते काम केले साफसफाईचे अर्धवट केलेले काम तातडीने पुर्ण करून ग्रामस्यांना सहकार्य करावे. आज रोजी परिस्थितीत लेंडी नाल्यात खूप मोठ्या प्रमाणात घाण व काटेरी झुडुपे असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे येवदा गावात लेंडी नाल्यात सर्वदूर घाणीचे साम्राज्य पसरले आहे याबाबत पुन्चछा स्मरणपत्र संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाला दिले असून ग्रामपंचायतने पावसाळ्यापुर्वी उपाययोजना करावी अशी मागणी निवेदनाद्वारे प्रहार संघटनेने केली असून यापुर्वी पावसाळ्यात नाल्या लगतच्या नागरिकांच्या घरात वारंवार पाणी घुसत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. येणाऱ्या पावसाळ्यापुर्वी वेळीच ग्राम पंचायत प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु अद्यापही प्रशासनाकडून या समस्येबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्याने लेंडी नाल्याला पुर आल्यास तेथील कुटुंबाचे शारीरिक,आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब गंभीर स्वरुपाची असून ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत त्वरित करून नाल्यातील झाडे झुडपे काढून ,साफसफाई करण्याची कार्यवाही न केल्यास , प्रहार संघटनेच्या वतीने ग्राम पंचायत कार्यालयात आंदोलनचा इशारा प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर यांनी दिला आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।