गोदावरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ श्री राजेंद्र भट्टड यांचा ५८ वा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

77

दर्यापूर :- हायटेक गोदावरी हॉस्पिटलचे संचालक ,गोदावरी पतसंस्थेचे अध्यक्ष,एकविरा स्कूल ऑफ ब्रिलिण्ट्सचे अध्यक्ष ,गोदावरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मदनगोपाल भट्टड यांचा ५८ वा वाढदिवस आज दिनांक १०/०५/२०१९ रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा केला गेला.
त्यात सकाळी ८ वाजता पाणपोईचे उदघाटन गोदावरी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले त्यानंतर लगेच सकाळी ९ वाजता उपजिल्हा रुग्णालय येथे वॉटर कूलरचे उदघाटन व फळवाटप करण्यात आले , सकाळी १० वाजता ब्लड डोनेशन कॅम्प गोदावरी हॉस्पिटल येथे घेण्यात आला त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला तदनंतर सकाळी ११ वाजता गोदावरी कुटुंब आरोग्य कार्डचे उदघाटन करण्यात आले.

 

सदर कार्यक्रमात मराठी पत्रकार संघ ,सुविधा मेडिकल , पँँथालाजी उपजिल्हा रुग्णालय,एकविरा स्कूल गोदावरी पतसंस्था, गोदावरी फ़िजिओथेरपी सेंटर,महेब मेडिकल ,सेवानिवृत्त गृह रक्षक दल संगठना, रामायण सेवा समिती , श्री शिवाजी शिक्षण संस्था,स्थानिक वकील संघ , मेडिकल असोसिएशन सोबतच गोदावरी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।