मोर्शी तालुक्याला ड्रायझोन मुक्त करण्यासाठी शासनाला अपयश ! शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करूनही ड्रायझोनचा कलंक मिटता मिटेना ! अप्पर वर्धा धारणातील गाळ काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ! मोर्शी तालुक्यातील सिमेंट बंधारे नामशेष होण्याच्या मार्गावर ! भूगर्भातील पातळी घटली ; शेतकरी संकटात ; संत्रा उत्पादकांना फटका !

130

मोर्शी तालुक्याला ड्रायझोन मुक्त करण्यासाठी शासनाला अपयश !

शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करूनही ड्रायझोनचा कलंक मिटता मिटेना !

अप्पर वर्धा धारणातील गाळ काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

मोर्शी तालुक्यातील सिमेंट बंधारे नामशेष होण्याच्या मार्गावर !

भूगर्भातील पातळी घटली ; शेतकरी संकटात ; संत्रा उत्पादकांना फटका !

विशेष प्रतिनिधी /

मोर्शी तालुक्यात जलसंधारणाच्या कामावर कोट्यावधी रुपये खर्च करूनही मोर्शी तालुक्याला लागलेला ड्रायझोन चा कलंक मिटू शकला नाही , मोर्शी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेद्वारे शासनाने जलसंधारनाची कामे मोठ्या प्रमाणात केली म्हणून जलयुक्त शिवार योजनेकडे मोठ्या आशेने पाहिले जाते. कोरड्या दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाचे वतीने परिसरातील गावाचा समावेश जलयुक्त शिवार योजनेसाठी करण्यात आला. परंतु जलयुक्त शिवारातून पाण्याच्या नैसर्गिक साठय़ांचे बळकटीकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न होतांना दिसत नाही . याशिवाय, कृत्रीम तलाव निर्मितीलाही संधी आहे. नागरिकांच्या सूक्ष्म नियोजनाची व आवश्यकतांना प्राधान्य देण्याची गरज आहे. मोर्शी तालुक्यात शासनाने तयार केलेले सिमेंट प्लग बंधारे व कोल्हापुरी बंधारे शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे जीर्णावस्थेत असून ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे , त्या शेकडो सिमेंट प्लग बंधाऱ्याच्या दुरुस्तीकरिता मोर्शी तालुक्यात निधी उपलब्ध होत नसल्याची शोकांतिका आहे . त्या सिमेंट प्लग बंधाऱ्यांचे व कोल्हापुरी बंधाऱ्यांचे खोलीकरण त्याची दुरुस्ती जल युक्त शिवार योजनेच्या माध्यमातून केल्यास त्या बंधाऱ्याच्या माध्यमातून मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होऊन त्याचा फायदा हजारो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो . त्या दिशेने पावले उचलल्यास जलसंसाधनाची मोठी कामे मोर्शी तालुक्यातील गावांना होऊन काही प्रमाणात का होईना पाण्याच्या समस्येवर मात करता येणार आहे.

जल युक्त शिवार योजनेतील रखडलेली व नवीन मंजूर होणारी कामे पावसाळ्याआधी दोन महिन्यात पूर्ण करणे गरजेचे होतेे . सिमेंट प्लग बंधारे दुरुस्ती करणे , खोलीकरण करणे , शेततळे , मोर्शी तालुक्यातील सिंचन प्रकल्पांचे अपूर्ण कामे इत्यादी कामांना उशिर का होत आहे, याचा जाब शासन प्रशासनाला विचारण्याची व त्यासाठी कठोर भुमिका घेण्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे . मोर्शी तालुक्यातील सिंचन प्रकल्पांची कामे थंडबस्त्यात पडली आहे . त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल व सिंचनाच्या सोई उपलब्ध होईल अशी कोणतीही उपाय योजना होतांना दिसत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे .शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या रक्कमेतून मात्र, सक्तीने पीक विम्याची रक्कम कपात करण्यात येते . शेतकऱ्यांनी काढलेला पीक विमा चा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाहि . यावर्षी शेतीला दुष्काळाचा फटका बसला. कमी पडणाऱ्या पावसाचा परिणाम आता सर्वांना सहन करावा लागत आहे. तलाव, सिंचन प्रकल्प , कोल्हापुरी बंधारे , सिमेंट प्लग बंधारे , शेततळे , सुरुवातीलाच कोरडे पडत आहे . शेतातील विहिरीबरोबर गावातील विहिरीची लेवल खालावत आहे . मोर्शी तालुक्यात ८०० ते १२०० फुटापर्यंत खोदल्या गेलेल्या बोरवेल मुळे पाण्याच्या उपशामुळे तर परिस्थिती भिषण झाली आहे. यावर्षी तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने घटत गेली . नैसर्गिक जलस्त्रोतांवर त्याचा परिणाम जाणवत आहे. मोर्शी तालुक्यातील शेतातील काही विहिरी सप्टेंबर महिन्यापासूनच कोरड्या पडत गेल्या . शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येण्याची चिन्हे दिसत आहे . त्यावर उपाययोजना व जलसंसाधनाची कामे न झाल्यास परिस्थिती गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे.

मोर्शी तालुक्यात हजारो हेक्टरमध्ये शेती संत्रा पिकांखाली आहे. काही ठिकाणी तर खरिपातील कपाशी , ज्वारी , सोयाबीन , पीक घेतल्यानंतर जमीन पडीक राहते. मोर्शी तालुक्यात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. मोर्शी तालुक्यात अप्पर वर्धा धरण , असून घोळदेव सिंचनप्रकल्पाचे कॅनल अपूर्ण अवस्थेत आहे , लहान मोठे तलाव व शेततळे , कोल्हापुरी बंधारे , सिमेंट बंधाऱ्यांची संख्या अधिक असताना त्यावर करोडो रुपये खर्च करूनही पाण्याची पातडी वाढत नसून मोर्शी तालुक्याला ड्राय झोनचा लागलेला कलंक शासनाला मिटविण्यास अपयश आल असून मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरण गाळाने भरलेले असून त्या धरणातील गाळ काढण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाय योजना होतांना दिसत नाही त्यामुळे अप्पर वर्धा धरणातील पाण्याची साठवण क्षमता बेताची आहे.त्यामुळे मोर्शी तालुक्यात सिंचनाचा प्रश्न निर्माण होतांना दिसत असून त्यासाठी कोणत्याही ठोस उपाय योजना होत नसल्याने दरवर्षी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकर्‍यांनाच करावा लागतो हे विशेष !

असं म्हणतात की संकटातही संधी असते.. अशीच संधी यंदाच्या दुष्काळामुळे आली होती.. ती म्हणजे वर्षानुवर्षे गाळाने भरलेले अप्पर वर्धा धारण , तलाव, बंधारे, धरण गाळमुक्त करून पाणी साठवण क्षमता वाढवण्याची. पण लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दूरदृष्टीअभावी दुष्काळात पाण्याचे स्रोत गाळमुक्त करुन अधिक बळकट करण्याची सुवर्णसंधी हातून जाण्याचा मार्गावर आहे . मोर्शी वरुड तालुक्यातील बहुतांश धरणे यावर्षी कोरडी पडली. हे संकट असले तरी याला संधी समजून पात्रातील गाळ काढण्याची आवश्यकता होती. मात्र जिल्ह्यातील एकाही धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले नाही. गाळ काढण्याचे नियोजन केले असते तर पाणीसाठा वाढला असता.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।