मुलाच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप” बुद्रे परिवाराने जोपासली सामाजिक बांधिलकी

179

बुद्रे परिवाराने जोपासली सामाजिक बांधिलकी

बीड परळी वैजनाथ : नितीन ढाकणे

आजच्या या युगात वाढदिवसावर लोक लाखो रूपये खर्च करतात.पण या परळी वैजनाथ येथील श्री व सौ उज्वला सुरेशअप्पा बुद्रे यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देत शालेय विद्यार्थ्यांना  शालेय साहित्य व मिठाई वाटुन साजरा केला आहे.

श्रीमंत असो वा गरीब रूबाब मात्र बडेजाव करून वाढदिवसानिमित्त पै पाहुणे, मित्र मंडळी यांना बोलावून हॉल,मंडप, डेकोरेशन अवाढव्य खर्च करणे आदी परंपरा सध्या समाजात जोमात सुरू आहेत.शिवाय वाढती महागाई तरी देखील समाजात अशा प्रवृत्तींना ऊत आला असून सर्व काही असतांना देखील समाजासाठी आपण काही देणं लागत या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत परळी वैजनाथ येथील नांदुरवेस भागातील श्री व सौ उज्वला सुरेशअप्पा बुद्रे  यांनी मुलगा चि.रविशंकर याच्या 5 व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

नांदुरवेस भागातील श्री व सौ उज्वला सुरेशअप्पा बुद्रे  यांचा मुलगा चि.रविशंकर याच्या 5 वा वाढदिवसानिमित्त कसलाही गाजावाजा न करता विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला. दरम्यान या सामाजिक उपक्रमाबद्दल बुद्रे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

श्री व सौ उज्वला सुरेशअप्पा बुद्रे  यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देवून आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त नांदुरवेस भागातील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप केले. समाजात सध्या वाढदिवसानिमित्त मोठा गाजावाजा करून खर्च करण्यात येतो. बुद्रे यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजात नविन पायंडा पाडला असून बुद्रे परिवाराचे सर्वत्र कौतूक होत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।