पंढरपूर येथील विठ्ठलाच्या जुन्या सेवेधाऱ्यानी बांधले दुसरे विठ्ठल मंदिर – कुटुंबाचे खासगी मंदिर असल्याचे बडवे कुटुंबीयांनी केले स्पष्ट

650

पंढरपूर:-

पंढरपूर येथील विठ्ठलाचे सेवाधारी असलेल्या बाबा बडवे यांनी आपल्या कौटुंबिक खासगी जागेत विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर पंढरीत दुसरे विठ्ठल मंदिर उभारल्याच्या चर्चेला तोंड फुटले असले, तरी 406 वर्षांपूर्वीच शहरात दुसरे विठ्ठल मंदिर उभे केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे पंढरपुरात बडवे यांनी उभे केलेले विठ्ठल मंदिर हे आपल्या कुटुंबाचे खासगी मंदिर असल्याचेही बडवे कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान बडवे कुटूंबीयाच्यावतीने या मंदिरास प्रति विठ्ठल मंदिर म्हणू नये असे आवाहन करून हे मंदिर आपल्या कुटूंबीयांचे खासगी मंदिर असल्याचे स्पष्ट केले आहे.  यामुळे दुसरे विठ्ठल मंदिर उभा केल्याची चर्चा अनाठायी असल्याचेही वारकरी संप्रदायातून बोलले जाऊ लागले आहे.  पंढरपूर शहरातील सर्व मठ, मंदिरातून विठ्ठल मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. घरा-घरात विठ्ठलाच्या मुर्त्या पुजल्या जातात.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।