अखेर सन्माननीय यशोमतीताईंच्या हट्टाने 0.2 दशलक्ष घनमिटर पाणी वाया गेले. – आ.डॉ. अनिल बोंडे

0
1069
Google search engine
Google search engine

काय साधले यशोमतीताईंनी पाण्याचा अपव्य्‍य करुन ?

 

  0.2 दशलीक्ष घनमीटर पाणी तिवस्यापर्यंत पोहोचणार नाही हे वारंवार सांगुनही शिव्या देऊन, दहशत पसरवुन, अधिकारी व मा. पालकमत्र्यांवर दबाव आणुन सन्मा. यशोमतीताईंनी अप्पर वर्धामधुन पाणी सोडुन घेतले. धरणावर गेल्या, फोटो काढले, फेसबुक लाईव्ह केले, राजकारण यशस्वी झाल्याच्या तो-यात अमरावतीला परत आल्या. पाणी फक्त अंभो-यापर्यंत 3 किमी. अंतरावर गेले. गरम नदी पात्रातुन ढगात गेले, उरलेले मनुष्य वस्ती नसलेल्या भागात झिरपले. पाणी वाचवा आम्ही शेतक-यांना सांगतो. ठिंबक करा, नळाला तोटया लावा, पाण्याची नासाडी करुन नका आम्ही वारंवार सांगतो आणी राजकारणासाठी पाणी ढगात पाठवतो.
सन्मा. यशोमतीताईंचा कालचा राडा अशोभनीय होता. एका भगीनीच्या तोंडी न शोभणारी भाषा होती पालकमंत्र्याच्या उपस्थितीत केलेली दादागीरी होती. कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणतात आम्ही प्रेमाने बोलतो, वागतो. हा अजब प्रेमाचा गजब अविष्कार होता. सत्य सोबत नसले म्हणजे करावे लागणारे आकांड तांडव होतो.
“अपर वर्धाची पाण्याची सत्य स्थिती”
दि. 1 मे 2019 पर्यंत अंदाजित जलसाठा 101 दशलक्ष घनमीटर होता. परंतु आजच्या तारखेला 85 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. त्यापैकी 5 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे. उरलेल्या पाण्यामधुन अमरावती मनपाला 46 दशलक्ष घनमीटर, मोर्शी न.प. ला 2 दशलक्ष घनमीटर, वरुड न.प. ला 2.2 दशलक्ष घनमिटर, लोणी पाणी पुरवठा योजनेला 0.283 दशलक्ष घनमीटर, हिवरखेड पाणी पुरवठा योजनेला 0.3 दशलक्ष घनमीटर पाणी दयायचे आहे. तिवसा प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेचे पाणी 0.2 दशलक्ष घनमीटर पाणी कालच सोडण्यात आलेले आहे. म्हणजे 80 पैकी 51 दशलक्ष घनमीटर पाणी माहे जुन अखेरपर्यंत आवश्यक आहे.

“पुढील वर्षाचे काय ?”

585 दशलक्ष घनमीटर जलसाठा असलेल्या धरणाचा येवा 18% कमी झालेला आहे. अपर वर्धा धरणाच्यावर पंढरी प्रकल्प 100 दशलक्ष घनमीटर पाणी साठयाचे काम पुर्णत्वास, पाक प्रकल्प, नागठाणा 1, नागठाणा 2, झटामझीरी, भेमडी ही प्रकल्प पुर्ण झाल्यामुळे अपर वर्धा धरणाचा येणारा पाण्याचा स्त्रोत 18 ते 20% नी कमी होणार आहे.
अपर वर्धा धरणामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये धरणात झालेल्या गाळामुळे धरणाची जल साठवण क्षमता 10 टक्याने कमी झालेली आहे. त्यामुळे धरणाची क्षमता व येणारे पाणी 375 दशलक्ष घनमीटर अंदाजित राहणार आहे. यावर सर्व शेतक-यांचे सिंचन, पाणीपुरवठा, पेयजल पुरवठा, अवलंबुन राहावे लागणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षीही पावसाळा यथातथाच राहीला तर पेयजलासाठी अवलंबुन असणा-या गावांना, शहरांना पिण्याच्या पाण्यासाठी अतिव संघर्ष करावा लागेल.
“पाणी सोडण्यासाठी तिवसा नगरपंचायत व गावांची मागणी होती काय ?”
तिवसा नगरपंचायतच्या अध्यक्षांनी पाणी सोडल्यानंतर पाणी सोडण्याकरीता पत्र दिले. यशोमतीताईंनी वादळी बैठकीनंतर, पाणी सोडण्याचे तोंडी आदेश पालकमंत्र्यानी दिल्यानंतर 50 गावाचे पत्र दिले. कोणत्याही ग्रामपंचायतचा पाणी सोडण्यासाठी ठराव नाही, नगरपंचायतचा सुध्दा ठराव नाही. नगरपंचायतच्या मुख्याधिका-यांची मागणी नाही. म्हणजे आले ताईच्या मना, करुन टाकली पाण्याची दैना अशी परीस्थिती आहे.
मी चारघड धरणामधुन पाणी नदीमध्ये सोडले. गावांनी दुष्काळ असल्याचा ग्रामपंचायतचा ठराव घेवुन मा. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी करावी लागते. मा.जिल्हाधिकारी व मा.जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दुष्काळी परीस्थितीचा आढावा अधिका-यांमार्फत गावात जावुन घेतात. त्यामध्ये तथ्य आढळल्यास हा प्रस्ताव जलसंपदा विभागास पाठविला जातो. जलसंपदा उपलब्ध पाणीसाठा, नदीमध्ये पाणी सोडल्यानंतर गावापर्यंत जाणार काय? व कीती पाणी सोडावे लागेल याचा आढावा घेवुन शिफारशीस मा.कार्यकारी संचालक विदर्भ सिंचन महामंडळ यावर MWRRA च्या मार्गदर्शक तत्वानुसार नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेवु शकतात. दुर्देवानी सन्मा. ताईंनी विनाकारण हटट केला व अधिका-यांना तोडघशी पाडले.
“तिवसा नगरपंचायतचे आरक्षण”
तिवसा पाणी पुरवठा योजनेकरीता 0.200 दशलक्ष घनमीटर चे आरक्षण मा. पालकमंत्र्याच्या अध्यक्षेतेखाली समीतीने दिले आहे. परंतु ते पाणी पुरवठा योजनेकरीता आहे, नदीमध्ये पाणी सोडण्याकरीता नाही. सन्मा. ताईंनी आपली शक्ती व बुध्दी 10 वर्षात ग्रॅव्हीटीवर आधारीत तिवसा पाणीपुरवठा योजनेकरीता लावली नाही. हे तिवस्याच्या जनतेचे दुर्देव असेही ते म्हणाले
मा. पालकमंत्री व अधिकारी वर्गांना विनंती.
मा.पालकमंत्री, मा.उपाध्यक्ष विदर्भ सिंचन महामंडळ, मा. जिल्हाधिकारी, जलसंपदाचे सर्व अधिकारी यांना माझी नम्र विनंती आहे. की जनआंदोलनाचा निश्चीतच आदर राखावा परंतु 100 गुंड घेवुन महत्वाची बैठक घेणे, शिव्या देणे, फेकुन मारणे अशा विघातक कृत्याला बळी पडु नये. आपणावर सर्व जिल्हयाचे पालकत्व असल्याने सर्व नियमाचे पालन करुन निर्णय घेतला तर पाणी अपव्ययासारखे नुकसान होणार नाही. एका शिव्याची लाखोळी वाहणा-या आमदारांच्या दबावाखाली निर्णय घेउन पाणी जपुन वापरणा-या शेतकरी व नागरीकांचे मन विष्पण्ण झाले आहे.
पुढील अपेक्षा ?
·        अशा दुष्काळाच्या परीस्थितीमध्ये अपर वर्धा नदीमध्ये पाणी सोडण्याचा घातकी निर्णय मा. पालकमंत्री, मा. उपाध्यक्ष विदर्भ सिंचन महामंडळ, मा.जिल्हाधिकारी, मा. कार्यकारी संचालक विदर्भ सिंचन महामंडळ यांनी घेवु नये.
·        अपर वर्धा किंवा इतर धरणामध्ये असलेला जलसाठा वाया जावु न देता काटेकोरपणे वापरण्याकरीरता समीती व Task Force तयार करण्यात यावा.
·        वर्तमान पत्र व माध्यमांना विनंती की पाणी हा महत्वपुर्ण विषय असल्याने योग्य शहानिशा करावी.
·        मोझरी व तिवसा या गावाकरीता गुरुत्वाकर्षणावर आधारीत पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करावी
·        अपर वर्धा धरणामधुन तसेच अमरावती जिल्हयामध्ये इतर धरणामधुन गाळ काढण्याकरीता सोफिया प्रकल्पाने पाणी पुनरजिवणाकरीता जमा केलेले 125 कोटी रु. प्राधान्याने खर्च करावे.
·        तिवसा, भातकुली, अमरावती तालुक्यामध्ये लोकसहभाग व जलजागरणाच्या माध्यमातुन जलसंधारणाच्या कामाला गती दयावी.
·        70 गाव पाणी पुरवठा योजना तातडीने कार्यान्वीत करावी.
·        भातकुली तालुक्यातील खारपाण पटयामधील सर्व गावांकरीता पाणी पुरवठा योजना मंजुर करावी.
आ.डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकार परीषद मध्ये केली यावेळी संजय घुलक्षे – जि.प. सदस्य,आप्पासाहेब गेडाम – उपाध्यक्ष न.प. मोर्शी डॉ. नितीन वानखडे – भाजपा पदाधिकारीराजु सुपले – शहराध्यक्ष भाजपा वरुड,किशोर भगत – नगरसेवक वरुड न.प.,नरेंद्र बेलसरे – गटनेता न.प. वरुड,युवराज आंडे – भाजपा पदाधिकारी,नंदकीशोर आजनकर – भाजपा पदाधिकारी,सचिन लुंगे – सरपंच खोपडा, अजिंक्य लुंगे -युवा भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.