हिंदु महासभेकडून अभिनेते कमल हसन यांना ठार मारण्याची धमकी

35

मेरठ (उत्तरप्रदेश) – नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदु आतंकवादी होता, असे विधान करणारे अभिनेते आणि ‘मक्कल निधी मियाम’ पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांना ‘अखिल भारतीय हिंदू महासभे’ने जाहीरपणे ठार मारण्याची धमकी दिली आहे. ‘गोडसे यांच्याविषयी असे वक्तव्य करणारी व्यक्ती हिंदु धर्माला कलंक आहे’, असे विधान ‘अखिल भारतीय हिंदू महासभे’चे प्रदेश प्रवक्ता अभिषेक अग्रवाल यांनी येथे केले आहे. यापूर्वी ‘कमल हसन यांची जीभ छाटली पाहिजे’, असे विधान तमिळनाडूचे दुग्धोत्पादन मंत्री के.टी. राजेंद्र बालाजी यांनी केले होते.

अग्रवाल पुढे म्हणाले की, पंडित नथुराम गोडसे हे हिंदूंचे आदर्श होते आणि रहातील. जिहादी आतंकवाद्यांचे समर्थन करणारे फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, नवज्योतसिंह सिद्धू हे आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी गोडसे यांचे नाव आतंकवादाशी जोडण्याचे काम केेले जात आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।