लोकसभा निवडणुकीनंतरही मतदार नवीन ओळखपत्रापासुन वंचित – चुका दुरूस्ती होऊनही नाही मिळाले रंगीत ओळखपत्र, निवडणुक विभागाचे दुर्लक्ष

34
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)
लोकसभा निवडणुकीच्या पोचपावती नंतर ओळखपत्र वाटपामध्येही चांदूर रेल्वे येथील निवडणुक विभागाचा घोळ सुरूच आहे. लोकसभा निवडणुक मतदान होऊन एक महिना उलटला तरीही काही मतदारांना नवीन रंगीत ओळखपत्रांचे (व्होटर आयडी कार्ड) वाटप झालेले नसल्याचे समजते. कार्यालयामध्ये फेरी मारूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीनंतर आता ओळखपत्र मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारास ओळखपत्र दिले आहे. यापूर्वी कॉम्प्युटरवर मुद्रित केलेले कृष्णधवल ओळखपत्र देण्यात येत होते. परंतु आता आकर्षक असे, रंगीत पॉलिमेरायझिंग विनाइल क्लोराइड (पीव्हीसी) ओळखपत्र देण्यात येते. लोकसभा निवडणुकीपुर्वी प्रशासकीय स्तरावर अनेक महिन्यांपासून नवीन मतदार, मतदारांचा पत्ता बदल, ठिकाण बदल आदी दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते. चांदूर रेल्वे येथील नागरिकांनी मतदान यादीमधील नावामधील व इतर त्रुटी सुधारण्यासाठी अर्ज केले होते. अनेकांनी नवीन नोंदणीचे अर्ज भरले होते. त्यांनी अर्ज केल्यानंतर नवीन ओळखपत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) मतदारांच्या घरी जाऊन देण्यात येईल असे निवडणुक विभागातर्फे सांगण्यात आले होते. अशातच चांदूर रेल्वे शहरातील राम नगर येथील यादी भाग क्रमांक ९० मधील अनुक्रमांक ३०७ असलेल्या एका मतदाराने नाव व फोटो दुरूस्तीसाठी ऑनलाईन पध्दतीने २८ सप्टेंबर रोजी अर्ज केला होता. सदर अर्जावर ३० नोव्हेंबर रोजी बीएलओंना अपॉईंट करण्यात आले. अर्ज सत्यापित झाल्यानंतर १ डिसेंबर रोजी स्विकारण्यात आला. सर्व झाले असतांना नवीन ओळखपत्र निवडणुकीआधी येणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. निवडणुकीच्या वेळी मिळालेल्या पोचपावतीवर मात्र सर्व चुका दुरूस्त होऊन आल्या. चुका दुरूस्त झाल्यानंतर मतदान कार्ड यायलाच हवे होते. मतदान कार्ड आलेच नाही की येऊनही केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत घरी पोहचले नाही ? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता निवडणुक विभागाने जातीने लक्ष देऊन नवीन ओळखपत्रापासुन वंचित राहिलेल्या अशा मतदारांना ओळखपत्र द्यावे अशी मागणी होत आहे.
आलेल्या ओळखपत्रांचे केले वाटप – तहसीलदार इंगळे 
लोकसभा निवडणुकीपुर्वी आलेल्या नवीन ओळखपत्रांचे बीएलओमार्फत वाटप करण्यात आले आहे. ज्यांचे ओळखपत्र राहिले असतील ते दुसऱ्या टप्प्यात येतील असे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी सांगितले.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।