पळसखेड येथील रायगड प्रकल्पातील चोरीच्या रेतीचा तलाठीचा अहवाल ठरला खोटा – तहसीलदारांनी कंपनीला कारवाईमध्ये दिले क्लीन चिट

34

महसुल विभागाचा अजब कारभार

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)

     फेब्रुवारी, मार्च महिण्यात सगळीकडे रेती घाट बंद असतांनाही चांदूर रेल्वे तालुक्यात मात्र रेतीची सर्रास वाहतुक झाली. अशातच चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड येथील रायगड प्रकल्पाच्या शासकीय कामात हीच अवैध रेतीचा उपयोग होत होता. मार्च महिण्यात तलाठी यांनी रायगड प्रकल्पाला भेट देऊन रेतीचा पंचनामा केला व सदर रेती चोरीची असल्याचा अहवाल दिला. परंतु सदर अहवाल खोटा ठरला असुन तहसीलदारांनी कंपनीला कारवाईमध्ये चक्क क्लीन चिट दिल्यामुळे अनेक चर्चांना उधान आले असुन महसुल विभागाच्या कारभाराविषयी आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

       चांदूर रेल्वेवरून १० कि.मी. अंतरावर पळसखेड येथील रायगड प्रकल्पाचे काम सन २००७ पासुन सुरू असुन अजुनही अपुर्णच आहे. बाजोरीया कंस्ट्रक्शन यांनी या प्रकल्पाचे काम सुरू केले होते. मात्र त्यांनी मधातुनच सदर काम सोडून दिले. त्यानंतर आता नागपुर येथील फुके यांच्या आदर्श कंस्ट्रक्शन कंपनीने सदर काम हाती घेतले आहे. मात्र या कंपनीतर्फे फेब्रुवारी व मार्च महिण्यात चोरीच्या रेतीने काम सुरू असल्याची चर्चा परिसरात ऐकावयास मिळाली होती. या प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी अंदाजे ८० ब्रास रेती पडून होती. यामधील काही रेती गिट्टीच्या चुरीमध्ये मिक्स करण्यात आल्याचे दिसुन आले होते. परंतु सदर रेती दोन वर्षापुर्वीची असल्याचा दावा सदर कंपनीतर्फे करण्यात आला होता. मात्र पळसखेड येथील तलाठी  यांनी मार्च महिण्यात पंचनामा करून ३० ब्रास रेती रायगड प्रकल्पाजवळील राईगुई नदीपात्रातुन आणल्याचे नमुद केले असुन ही रेती एकप्रकारे चोरीची असल्याचे सांगण्यात आले होते. या पंचनामानंतर तहसील कार्यालयातर्फे कंपनीला नोटीस बजावुन हजर राहण्याचे आदेश दिले होते. दोन महिण्याच्या जवळपास चाललेल्या  कारवाईच्या प्रक्रियेत आता तलाठी यांचा चोरीच्या रेतीचा अहवाल खोटा ठरला असुन कंपनीला त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर यामध्ये कोणतीही कारवाई तहसीलदारांकडून करण्यात आली नाही. तलाठी यांनी चोरीच्या रेतीचा अहवाल दिल्यानंतर तहसीलदारांनी कारवाईसाठी जवळपास दोन महिण्यांचा कालावधी लावल्यानंतर व शेवटी कंपनीला क्लीन चिट दिल्यामुळे तालुक्यात अनेक चर्चांना उधान आले होते. परंतु दोन महिणे चाललेल्या या प्रशासकीय खेळात महसुल विभागाचा अजब गजब कारभार पुढे आला आहे.

पुर्वीच एक्स्ट्रा रॉयल्टी भरलेली – तहसीलदार इंगळे

सदर कामावरील रेती त्यांचीच असुन फक्त बाजुला सरकविल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. तसेच या रेतीची पुर्वीच एक्स्ट्रा रॉयल्टी भरलेली असुन त्याबाबतचे कागदपत्रे व लेखी लिहुन सदर कंपनीने दिल्याचे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी सांगितले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।