पहिले लेखी तक्रार द्या नंतर नळावर मोटारी लावणाऱ्यांवर कारवाई – अजब नगरपरिषदेचा गजब सल्ला

45
चांदूर रेल्वेत घरोघरी नळावर मोटारी
सामान्य जनतेला पाणी मिळेना
चांदूर रेल्वे :- (शहेजाद खान) 
 चांदूर रेल्वे शहरात वीस दिवसानंतर नळ येत असल्याने अनेक घरोघरी नळावर मोटारी बसविल्याने सामान्य गरीब गरजू लोकांना याचा मोठा फटका बसत आहे. मात्र याकडे नगरपरिषद प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
 चांदूर रेल्वे शहरातील जनतेला गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे स्त्रोत पूर्ण पणे आटत चालले आहे. शहराला पाणी पुरवठा करणार मुख्य स्त्रोत म्हणजे मालखेड तलाव येथील पाणीपुरवठ्याची विहीर. पण तलावात पुरेसे पाणी नसल्याने त्या विहिरीची पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे शहरात पाणीपुरवठा हा १५ ते २० दिवसांवर जाऊन पोहचला आहे. आणि नळाला पाणी आले तरीही कुटुंबाला पुरेसे एवढे पाणी येत नसल्याने अनेक नागरिकांनी चांगली शक्कल लढविली आहे. चक्क घरोघरी खड्डे करून नळाला मोटारी लावल्या आहे. कोणाच्या घरी जास्त पाणी तर कोणाच्या घरी कमी, तर कोणाकडे काहीच नाही. त्यात ज्यांची परिस्थिती चांगली आहे, तोच व्यक्ती २ ते ३ हजार रुपयांची मोटर आपल्या घरी बसवतो. मात्र जे गरीब, गरजू मोलमजुरी करणारे लोक आहे, त्यांच्याकडे मोटारी नाहीत त्यांना पाणीच मिळत नाही.
   शहरात घरोघरी मोटारी लागल्या असतांना नगरपरिषद प्रशासन मात्र या गोष्टीकडे डोळेझाक पणा करत आहे. कोणाचेच याकडे लक्ष नाही. सामान्य जनतेने अनेक वेळा तोंडी नगरपरिषदेकडे तक्रारी केल्या. मात्र नगरपरिषदेने त्या लोकांना लेखी तक्रारी मागितल्याचे काहींनी सांगितले. जर लेखी तक्रारी जर जनतेने केल्या तर प्रत्येक मोहल्यात आपआपसात  भांडणे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु पाण्यासारख्या गंभीर प्रश्नावर प्रत्येकवेळी तक्रारीची काय गरज ? मग नगर परिषद प्रशासनाने झोपुनच राहायचे काय ? असा संतप्त सवाल नागरीक करीत आहे.
खर तर पाण्याचे काटेकोर योग्य नियोजन जर नगरपरिषदेने केले तर पाण्याची बचत होऊन जनतेला १५ ते २० दिवसांनी मिळनारे पाणी यात कपात होऊन दिवस कमी सुद्धा होऊ शकते. परंतु याकडे गरज आहे प्रशासनाने लक्ष देण्याची. सदर या सर्व बाबींसाठी प्रशासन ,नगरपरिषद लोकप्रतिनिधी कोणीही बोलण्यास तयार नाही.
(फोटो – संग्रहीत) 
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।