बैठकीस दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी – मजिप्राचे अधिकारी बैठकीला उपस्थित नसल्याने उपविभागीय अधिकारी करणार कार्यवाही

0
677
उपविभागीय अधिकारी महसुल यांनी तोडगा काढण्यासाठी केले प्रयत्न 
मजिप्रा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा श्री प्रदीप वडतकर यांचा इशारा
प्रतिनिधी / येवदा 
दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील पाण्याची टाकी दुरूतीबाबत तसेच पाणीपुरवठा बाबत प्रहार संघटनेने निवेदन सादर करून टाकीवर चढून २१ मे रोजी आंदोलन करण्याचा इशारा मजिप्राला  दिला होता. टाकीची झालेली दुरवस्था बघून कोणत्याही क्षणी जिवित हानी होऊ शकते , या संभाव्य संकटाची दखल घेत  महसुल उपविभागीय अधिकारी प्रीयंका आंबेकर यांनी मजिप्राचे  अधिकारी कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलकर, उप अभियंता दिनेश देशकर तसेच प्रहार पक्षाचे आंदोलक प्रदिप वडतकर यांच्या उपस्थितीत काल  ११ वाजता बैठकीचे आयोजन होते .या येवदा  वासीयांचे महत्वपूर्ण बैठकीला महसुल उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रहार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते वेळवर हजर होते परंतु मजिप्राचे अधिकारी हजर नसल्याने प्रदीप वडतकर संताप व्यक्त करून आक्रमक पवित्रा घेतला.  परिस्थिती हाताबाहेर  जाईल हे मजीप्रा अधिकाऱ्यांच्या कानावर येताच दिर्घ वेळेनंतर कनिष्ठ अभियंता गोपाल भगत उपस्थित झाले. त्यानंतर निवेदनाच्या अनुषंगाने येवदा गावातील पाण्याची टाकीबाबत चर्चा करण्यात आली .
मजिप्राचे अधिकारी उपस्थित नसल्याने महसुल उप विभागीय अधिकारी तसेच तहसिलदार व प्रहार पक्षाचे पदाधिकारी यांच्या वेळ मजिप्रा प्रशासनामुळे वाया गेल्याबाबत  व येवद्याच्या समस्येबाबत असंवेदनशील असलेल्या
मजिप्रा प्रशासनाच्या अधिका-यावर कार्यवाही करण्याची मागणी प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदिप वडतकर, प्रदिप चौधरी यांनी केली. संबंधित मजिप्रा अधिकारी यांच्यावर कार्यवाही बाबत महसुल उपविभागीय अधिकारी यांनी नोटीस बजावण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.मजिप्राचे गोपाल भगत यांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला परंतु प्रहार संघटनेच्या वतीने प्रदिप वडतकर यांनी मजिप्रा प्रशासनाला जाब विचारत २३ मे पर्यत उपाययोजना करावी अन्यथा २९ मे २०१९ रोजी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा इशारा आयोजित बैठकीत प्रहार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
 सदर बैठकीत महसुल उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर , तहसिलदार राहुल कुंभार , गट विकास अधिकारी चव्हाण मजिप्राचे गोपाल भगत, प्रहार संघटनेचे प्रदिप वडतकर , प्रदिप चौधरी ,सुधीर पवित्रकार , डॉ दिनेश म्हाला , बापुसाहेब साबळे , अनूप गावंडे ,विलास कैसर , पप्पू पाटील, धनंजय रेंघे, विवेक इंगळे ,मंगळ रघुवंशी , अनिल काळे, मंगेश सावळे, उमेश बुरे , पप्पू पाटील गावंडे , इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती….