चांदूर रेल्वे आगारातील वाहतुक निरीक्षकांचा मनमानी कारभार – मनमानी ड्युट्या लावत असल्याने महामंडळाला आर्थिक भुर्दंड

0
979
Google search engine
Google search engine
शिवशाही व सुपर बसवर वारंवार मोजक्याच चालकांची ड्युटी
आगार व्यवस्थापकांना लक्ष देण्याची गरज
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
नारूदुस्त बसेसमुळे चांदूर रेल्वे एसटी आगाराचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असतांना आता आगारातील पुन्हा एक प्रकार पुढे आला आहे. आगारातील वाहतुक निरीक्षकांचा मनमानी कारभार सुरू असुन आपल्या मर्जीनेच कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या लावत असल्याने महामंडळाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच शिवशाही व सुपर बसवर वारंवार मोजक्याच चालकांची ड्युटी लावत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
चांदूर रेल्वे आगाराच्या औरंगाबाद, जळगाव, वाशिम, नागपुर, शेगाव, माहुर आदी ठिकाणी सुपर बसेस दररोज ये – जा करतात. तसेच चांदूर रेल्वे – औरंगाबाद या मार्गाने शिवशाही बससुध्दा पाठविल्या जाते. शिवशाही बससाठी १९ चालकांनी अमरावती येथे जाऊन एक आठवड्याचे प्रशिक्षण घेतले. सुपर किंवा शिवशाही बसवर प्रत्येक चालकाला महिण्यातुन एक किंवा दोन वेळा जावे लागते. मात्र असे चांदूर रेल्वे आगारात होतांना दिसत नाही आहे. सुपर व शिवशाही बसवर वारंवार मोजक्याच चालकांना वाहतुक निरीक्षकांकडून पाठविल्या जात असुन इतर चालकांवर वाहतुक निरीक्षक विशेष मेहेरबानी दाखवित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे उर्वरीत काही चालकांनी शिवशाहीचे प्रशिक्षण केवळ नावापुरतेच घेतले असल्याचे चित्र आहे. तर हितसंबंध असल्यामुळे अनेक चालकांच्या महिनाभरही ड्युट्या साधारण बसेस वरच वाहतुक निरीक्षक लावत असल्याची चर्चा आगार परिसरात सुरू आहे. एसटी महामंडळाच्या नियमानुसार अतीकालीन भत्त्यावर कमी दराच्या चालक – वाहकांना प्राधान्य दिले पाहिजे. परंतु वाहतुक निरीक्षक आपल्या मर्जीने ड्युट्या लावुन अतीकालीन भत्त्यावर कमी दराच्या चालक – वाहकांना डावलुन जास्त दराच्या चालक वाहकांना प्राधान्य देत असल्याचीही बाब समोर आली आहे. यामुळे महामंडळाच्या परिपत्रकाचा अवमान केल्या जात असुन रा.प.म. चे आर्थिक नुकसान हेतुपुरस्पर केल्या जात असल्याचेही बोलल्या जात आहे. चांदूर रेल्वे आगारात टी९ रोटेशननुसार सुध्दा कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या लावल्या जात नसुन कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव केल्या जात आहे व औद्योगिक शांतता वाहतुक निरीक्षकांकडून भंग केल्या जात आहे. सदर प्रकाराबाबत कर्मचाऱ्याने वाहतुक निरीक्षकांवर विचारण केली असता, “तुम्ही मला विचारणारे कोण ? मी वाहतुक निरीक्षक आहोत, माझ्या मनात येईल त्याला ती कामगीरी लावणार, तुम्हाला माझी तक्रार करायची असल्यास करा, तुमच्याने जे होते ते करा” असे उध्दट उत्तर दिले जात असल्याचे कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. याबाबत अनेक तक्रारीसुध्दा झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. परंतु अन्यायग्रस्त कर्मचारी अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे अमरावती विभागीय वाहतुक नियंत्रक व चांदूर रेल्वेचे आगार व्यवस्थापकांनी या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष देऊन सर्व कर्मचाऱ्यांना समान वागणुक मिळेल याची दक्षता घेणे गरजेचे आहे व नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहतुक निरीक्षकांवर सुध्दा कारवाईचा बगडा उचलणे आवश्यक आहे. अन्यथा वाहतुक निरीक्षकांच्या अशा अरेरावी व उध्दटपणामुळे एखाद्या वेळी आगारात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कमी दराच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य – डीएम इंगळे 
आगारात रोज ७२ चालक – वाहकांच्या ड्युट्या लावतांना कोणाला तरी मागे पुढे होत असतात. तसेच नियमानुसारच अतीकालीन भत्त्यासाठी कमी दर वाल्यांना प्रथम प्राधान्य देण्याचा आगाराचा पुरेपुर  प्रयत्न असतो. ऐनवेळी जर डबल ड्युटीवर जाण्यास काही कर्मचारी तयार नसतात किंवा उपलब्ध नसतात तेव्हा वेळेवर गाडी काढावी लागते. कारण प्रश्न प्रवाशांचा असतो. त्यावेळीच जास्त दराच्या कर्मचाऱ्याला कामगिरी दिल्या जात असल्याचे आगार व्यवस्थापक इंगळे यांनी म्हटले.