आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना भारतीय जैन संघटना देणार आधार ; मोफत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना घेणार दत्तक

0
577
Google search engine
Google search engine

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना भारतीय जैन संघटना देणार आधार

मोफत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना घेणार दत्तक

उस्मानाबाद / प्रतिनिधी –
जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना भारतीय जैन संघटना व रयत शिक्षण संस्था शिक्षणासाठी दत्तक घेणार आहे. पाचवी ते सातवीमध्ये प्रवेशित होणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले व मुलींचा महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतचा शिक्षणासह सर्व प्रकारची सोय करण्यात येणार असून याची नोंदणी सुरू झाली आहे. ११ जूनपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे.

भारतीय जैन संघटने मार्फत गेल्या चार वर्षांपासून राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुले व मुलींना अाधार देण्यात येत आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत ९० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय करण्यात आली आहे. पुणे येथील वाघोली पुनर्वसन प्रकल्पामध्ये राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना १२ वी पर्यंतचे शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१६ नंतर ज्या मुला-मुलींच्या आई किंवा वडील यांच्यापैकी एकाने आत्महत्या केली असेल अशा चौथी उतिर्ण झालेल्या मुला-मुलींना पाचवीसाठी तसेच पाचवी उत्तिर्ण झालेल्या मुला-मुलींना सहावीसाठी प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य अादीची सोय असणार आहे.
रयत शिक्षण संस्थेमार्फत साताऱ्यामध्ये लक्ष्मीबाई पाटील हॉस्टेल व छत्रपती शाहू बोर्डिंगमध्ये पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. ज्या मुला-मुलींच्या आई किंवा वडील यांच्यापैकी एकाने २०१६ पूर्वी आत्महत्या केली असेल अशा मुला-मुलींनाही येथे प्रवेश देण्यात येत आहे. याची नाव नोंदणी सुरू करण्यात आली असून नोंदणीसाठीची अतिंम तारीख ११ जून आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना उस्मानाबाद येथून संघटनेतर्फे नेण्यात येणार आहे. नोंदणीसाठी अतुल अजमेरा (९८८११५२५५१), सचिन गांधी (७०८३२११००८), अॅड. उपेंद्र कटके (९४२०२०३८२२), अॅड. रोहन कोचेटा (९८२३३९८६६२), कांचनमाला संगवे (९४२२९३५९११), हर्षद अंबुरे (९४२२६५४९१०), प्रसन्न फडकुले, अतुल कांबळे यांच्याशी तसेच उस्मानाबाद येथील आयसीआयसीआय बँकेच्या शेजारी गांधी ट्रेडर्स आणि मारवाड गल्ली येथील हर्षिता इलेक्ट्रीकल येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.