डॉ संदीप राऊत यांना विद्यापीठ स्तरीय रा से.यो. पुरस्कार जाहीर

0
738
Google search engine
Google search engine

उत्कृष्ट रासेयो कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉ संदीप राऊत याची निवड ! 

रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी /

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा अंतर्गत दिला जाणारा विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना २०१८-१९ च्या पुरस्कारासाठी उत्कृष्ट माहाविद्यालाय गटातून भारतीय महाविद्यालय मोर्शी तर उत्कृष्ट रा से यो कार्यक्रम अधिकारी गटातून प्रा डॉ संदीप मनोहरराव राऊत(भारतीय महाविद्यालय,मोर्शी) याची निवड झाली आहे. .कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शना खालील समितीने ही निवड केली आहे.

डॉ संदीप राऊत यांनी २०१६ ते २०१९ या कालावधीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे विविध प्रबोधनात्मक, सामाजिक जाणिवेचे, पर्यावरणपूरक जल आणि आरोग्य संवर्धनात्मक कार्यक्रम कर्तव्या बरोबरच सामाजिक जाणिवेतून त्यांनी विविध उपक्रम  राबविले आहे.

मतीन भोसले यांच्या प्रश्नचिन्ह शाळेला अन्नधान्य व आर्थिक मदत, केरळ पूरग्रस्तांना आर्थिक मदत, दृष्टिहीन सेवा संघाला आर्थिक  सहायता,महापुरुषा च्या जयंती पुण्यतीथी निमित्त व्याखाना चे आयोजन, सिकलसेल, एड्स , कृष्टरोग निवारण आणि व्यसनमुक्ती,पर्यावरण जनजागृती, स्वच्छता अभियान, आरोग्य जनजागृती,मतदान जनजागृती, वृक्षारोपण ,  रक्तदान शिबिरे  तसेच खुल्या कारागृहातील बंदीजनासाठी सामूहिक रक्षाबंधन सोहळा, प्लास्टिक निर्मूलनासाठी कागदी/कापडी पिशव्यांचे वाटप,दत्तक गावात भूमिगत बंधाऱ्यांची तसेच शोषखड्डे  निर्मिती रस्ते विकास  असे एक ना अनेक उपक्रम व कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी तितकेच साह्यभूत ठरले आहे.

डॉ राऊत यांनी स्वच्छता मोहिमेला विशेष प्राधान्य देत प्रती वर्षी २० रविवारी २०० स्वयंसेवकाच्या श्रमदानाने/सहभागाने बस स्थानक, उपजिल्हा रुग्णालयात गांधी स्मारक , चर्च, महाविद्यालय परिसर , इतर सार्वजनिक ठिकाणी राबवलेली स्वच्छता मोहीम तसेच सार्वजनिक ठिकाणावरील स्वच्छता मोहिमेची रॅली,  शपथ व शहरात त्याबाबत विविध ठिकाणी लावलेले फ्लेक्स मोर्शी करासाठी आगळीवेगळी भेट ठरली आहे.तसेच दरवर्षी ५१  गावे,शाळा/महाविद्यालयातील संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री बाबतची विचार प्रबोधन मालिका तसेच अन्य आगळ्या वेगळ्या स्वरूपातील उपक्रम/कार्यकमाची  कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचे मार्गदर्शनाखालील समितीने  दखल घेत उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉ संदीप राऊत याची आणि उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून भारतीय महाविद्यालय मोर्शी ची निवड केली आहे. यासाठी प्राचार्य डॉ .सुरेश बिजवे, माजी प्राचार्य गोपीचंद मेश्राम यांचे मार्गदर्शन लाभले तसेच डॉ जयमाला रामटेके, डॉ.  सावन देशमुख,प्रा दीपक काळे,  प्रा. विनायक खांडेकर सह सर्व महाविद्यालयीन शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवर,समाजसेवक , सामाजिक कार्यकर्ते नागरिक रा से यो चे स्वयंसेवक यांचे विशेष  सहकार्य लाभले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातील मान्यवराकडून डॉ राऊत यांचे अभिनंदन केले जात आहे .