जांभुलखेड्याचा घटनेबद्दल नक्षलवाद्यांनी पत्रकातून वक्त केली प्रतिक्रिया-घटनेत सहभागी कॅडेरचे केले अभिनंदन

0
1265
Google search engine
Google search engine

निलेश मेश्राम/गडचिरोली ;-
गडचिरोली १ मे रोजी महाराष्ट्र दिनी नक्षल्यानि भुसुरुंग स्फोट घडवून १५ जवाणाचा बळी घेतला होता,या घटनेबद्दल नक्षल्यानि प्रथमच प्रत्रक काढून प्रतिक्रिया दिली आहे,पत्रकातून घटनेत सहभागी नक्सल कॅडेरचे अभिनंदन केले आहे,तसेच येत्या १९ मे रोजी बंद पाळण्याचे आवाहन केले आहे,
भामरागड-आरेवडा मार्गावर नक्षली पत्रके टाकली आहेत,यामध्ये नक्षलवाद्यनी जांभुलखेड घटनेला पोलिसांचे नक्सलाविरोधी सुरू असलेले अभियान कारणीभूत असल्याचे म्हटले आहे,या पत्रात मागील वर्षी २२एप्रिल ला झालेल्या कासनासुर तुमीरगुंडा चकमकीचा उल्लेख केला आहे , तसेच नुकतेच २७ एप्रिल रोजी ठार करण्यात आलेल्या नक्सल कमांडर रामको आणि शिल्पा या दोघांनी पोलिसांनि पकडून खोटी चकमक धाऊन ठार केल्याचे मटले आहे,या पत्रकातून पोलीस विभाग तसेच सरकार विरोधात मजकूर लिहण्यात आला आहे १९ मे रोजी जिल्हा बंद चे आवाहन करण्यात आले आहे ,तसेच रुग्णालये आणि अन्य अत्यावसिक सेवा वगळण्यात यावा , असेही आवाहन नकसल्यानी केले आहे,पोलीस अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली ,पोलीस विभाग या सर्व नक्सल घडामोडीवर लक्ष ठेऊन आहे ३० एप्रिल पासून अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली ,नागरिकांची हत्या करण्यात आली,तसेच अनेक ठिकाणी बॅनर, प्रतक टाकून विकासकामे बंद करण्याचे आवाहन केले जाते आहे,नकसली अनेक घातपात कारवाया घडवून आणत असल्यामुळे पोलिसांनी सतर्क राहून नक्सलाविरोधी अभियान सुरू ठेवले आहे,