Google search engine
Google search engine

अनिल चौधरी, पुणे 

 

 पुणे: सुनील कुमार (19 गुण), इलायाराजा (10 गुण) यांच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग  स्पर्धेत चेन्नईचॅलेंजर्स संघाने तेलुगू बुल्स संघाला 51-29  असे पराभूत केले.चेन्नईकडून बचावफळीत धनराज बी. ने पाच आणि मोफीमोंडलने तीन गुण मिळवतविजयात आपले योगदान दिले.तेलुगू बुल्स संघाला दोन्ही सामन्यात पराभूत व्हावे लागल्याने ते गुणतालिकेत झोन बी मध्ये तळाशी पोहोचले आहेततर, एक विजय व एक पराभव यासंह चेन्नईचा संघ दोन गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

  पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम येथे सुरू असलेल्या या सामन्यात चेन्नई चॅलेंजर्स संघाने पहिल्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ केला.चेन्नईकडूनकर्णधार सुनील कुमारने आक्रमक खेळ करत चेन्नईला 17-5 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये तेलुगू बुल्स संघाच्या बचवफळीनेचांगला खेळ करत संघाच्या गुणसंख्येत भर घातली.दुसरीकडे सुनील कुमारसोबत इलायाराजाने गुण मिळवत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलेव संघाला मध्यंतरापर्यंत 28-13 अशी आघाडी मिळवून दिली.दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये चेन्नईने 11-8 अशी बाजी मारली. पहिल्या सत्रात तेलुगू बुल्सच्याचढाईपटूंना फारशी चमक दाखवता आली नाही.

  तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये चेन्नईच्या संघाने आपला हाच फॉर्म कायम ठेवला.चेन्नईच्या सुनील कुमारने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवत संघासाठीगुणांची कमाई केली.त्याला पुन्हा एकदा इलायाराजाची चांगली साथ मिळाली.त्यामुळे तिसऱ्या क्वार्टरमध्ये देखील चेन्नई संघाने 16-8 अशी आघाडीकायम ठेवली.चेन्नईचा बचावफळीने देखील चांगला खेळ दाखवला.तेलुगू संघाकडून प्रयत्न झाले पण, तोवर उशीर झाला होता. चेन्नई संघाने हासामना 51-29 असा आपल्या नावे केला. शेवटच्या क्वार्टरमध्ये तेलुगू संघाने 8-7 अशी आघाडी घेतली पण, ती पुरेशी ठरली नाही.