परळी येथे वारकरी शिबीर उत्साहात सुरू

272

विभागीय अध्यक्ष रामेश्वर कोकाटे यांच्या उपस्थितीत
परळी येथे वारकरी शिबीर उत्साहात सुरू

परळी: नितीन ढाकणे
परळी येथे आज शनिवार दि.18 मे रोजी वारकरी शिबीरास आज अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यंाच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात सुरूवात करण्यात आली.
आज शनिवारपासून वारकरी शिबीर परळी येथे सुरूवात झाली असून  अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते  मृदंग पुजा करण्यात आली. या वेळी  उपस्थित  ह.भ.प.भरत महाराज सोडगीर, वासुदेव महाराज मुंडे, ह.भ.प.गोविंद महाराज नंदनंजकर, ह.भ.प.बालाजी महाराज कन्हेरवाडीकर, ह.भ.प.सचिन महाराज गित्ते,ह.भ.प. रूक्षराज महाराज आंधळे, ह.भ.प.अरूण महाराज शास्त्री, ह.भ.प.अशोक महाराज कराळे, ह.भ.प.अविनाश महाराज शिंदे यांच्यासह मराठवाडाभरातून आलेले अनेक मान्यवर उपस्थित होते.