निलेश मेश्राम/गडचिरोली:-
नकसल्यानी आज १९ मे रोजी गडचिरोली जिल्हा बंद चे आवाहन केले आहे,बंद दरम्यान नकसल्यानी रात्रीपासून हिंसक कारवाया केल्याचे दिसत आहे,एटापल्ली तालुच्यातील गुरपली पासून काही अंतरावर नकसल्यानी काही दिवसांपूर्वी जाळपोळ केलेल्या ट्रक जवळ झाडे तोडून टाकली , बनेर बांधून रस्ता अडविला आहे सध्या रस्ता सुरळीत चालू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे,तसेच भामरागड जवळील प्रलकोट नदीजवळ बनेर बांधले आहे,
नकसल्यानी झाडे तोडून रस्ता अडविल्या ठिकाणी बॅनर बांधले या बॅनर वर २७ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत उल्लेख केला आहे नकसली कमांडर रामको नराटे शिलपा धुर्वे याना गुणदूर्वाही येथे खोटी चकमक धाखाऊन सि-६० पथकाने ठार केल्याचे बनेरवर नमूद केले आहे,बनेर मराठी भाषेतून असल्यामुळे हे कृत्ये शहरी नकसल्यानी केल्याचे बोलले जात आहे,अतुदुर्गाम आणि सीमावर्ती भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला , आणि विकास कामे सर्व ठप्प पडली आहेत,