चांदुर बाजार नगरपरिषदेच्या हलगर्जीपणा मुळे प्रदुषण वाढत असल्याने प्रदुषण नियंत्रण मंडळानी दिली कारणे द्या नोटीस.

156

चांदुर बाजार:-
नगर परिषद चांदुर बाजार यांच्या सर्वे क्र. १२१ जसापुर रोड, चांदुर बाजार येथील घनकचरा विल्हेवाटीच्या जागी मोठ्या प्रमाणावर वायुप्रदुषण होत असल्याची फार चिंताजनक प्रकार समोर आला आहे. घनकचरा विल्हेवाटीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जाळण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय अमरावती यांनी नगर परिषद चांदुर बाजार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
नगर परिषद चांदुर बाजार यांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या ठिकाणी प्लास्टिक मोठ्या प्रमाणात जाळण्यात येत असल्याने मा. गौरव भोवते (सामाजिक कार्यकर्ता) यांनी वारंवार मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद चांदुर बाजार यांना प्रत्यक्ष भेटी घेऊन निदर्शनास आणुन दिले. परंतु अधिकारी उडवा उडवीचे उत्तर देत असल्याने लेखी स्वरूपात त्यांनी तक्रार सुध्दा केली. तरी सुध्दा प्लास्टिक जाळणे कमी होत नसल्याने त्यांनी आपला मोर्चा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ अमरावती यांच्या कळे वळवला. जेव्हा प्रदुषण नियंत्रण मंडळ अमरावती यांचे क्षेत्र अधिकारी यांनी दिनांक ०३/०४/२०१९ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता खालील बाबी समोर आल्यात.


घनकचरा विल्हेवाटीच्या जागेस प्रदुषण नियंत्रण मंडळ, अमरावती यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली असता, घनकचरा विल्हेवाटीच्या जागेवर घनकचऱ्यांचे विलगीकरण न करता घनकचरा व प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेला आढळला. तसेच सदरकचरा जळत असलेल्याचे पण निदर्शनास आले. त्यामुळे परिसरात नागरिकांना प्रदुषणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे आढळले. नागरी घनकचरा जागेस कंपाउंट वाल अथवा तारेचे कुंपन नसल्याचे आढळले. घनकचरा जागेवर विलगीकरणा करीता उभारण्यात आलेली यंत्र सामुग्री बंद असल्याचे निदर्शनास आले. सबब नगर परिषद चांदुर बाजार यांनी घनकचरा नियम २०१६ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने सदर नगर परिषदेस उपरोक्त संदर्भिय पत्र क्र. ४ अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।