अमरावती जिल्ह्यातील वलगाव पुनर्वसन वस्तीला आग 85 घरांची राखरांगोळी; आमदार यशोमती ठाकूर यांची घटनास्थळी भेट

1030

स्थानिक वलगाव येथील बाजारपुरा वार्ड क्र. 4 येथे 90 जणांची लोकवस्ती आहेत मात्र सकाळी अचानकपणे दोन सिलेंडरचा स्फोट झाला यात आगीने रूद्र रूप धारण करत एकापाठोपाठ एक घरे जळायला सुरवात झाली. यात पाहता पाहता 85 घरे पूर्ण पणे जळून खाक झाली.

ही सर्व घरे टिनपत्रे व कुळामातीचे होते या ठिकाणी आगीला नियंत्रणात आणण्यासाठी 5 अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून या ठिकाणी तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी मदत करत आगीने उध्वस्त झालेल्या परिवाराला आमदार यशोमती ठाकूर यांनी दिलासा दिला व शासनाचे वतीने आर्थिक नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।