टाटा एस व मारोती डिझायरची समोरासमोर जबर धडक १ गंभीर जखमी – धनोडी फाटा येथील घटना

0
1142
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
घोडा घेऊन जाणाऱ्या टाटा एस या मालवाहु गाडी व मारोती डिझायर या वाहनाची समोरासमोर जबर धडक होऊन एक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. २१) सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान धनोडी फाटा येथे घडली.
प्राप्तमाहितीनुसार, चांदूर रेल्वे शहरातील काझी पुरा येथील मोहम्मद नजीर मोहम्मद आजम (५८) हे घोडा घेऊन एमएच ०६ एजी ३२५३ या क्रमांकाच्या टाटा एस या मालवाहु गाडीने चालकासह तिवरा मार्गे धामणगावकडे जाण्यास निघाले होते. अशातच सातेफळ फाट्याच्या समोर धनोडीकडे वळत असतांना याच धनोडी फाट्यावर धामणगाव वरून चांदूर रेल्वेकडे विरूध्द दिशेने येणाऱ्या एमएच २७ बीव्ही ९०५३ क्रमांकाच्या मारोती डिझायर या कारला समोरून जोरदार धडक बसली. यामध्ये टाटा एस एक वेळा पलटी सुध्दा झाल्याचे काहींनी सांगितले. टाटा एसमध्ये चालकाच्या बाजुने बसलेले मोहम्मद नजीर यांना गंभीर दुखापत झाली. तर दोन्ही गाड्यांच्या चालकांना केवळ किरकोळ जखमा झाल्याचे समजते. गंभीर जखमी झालेल्या मो. नजीर यांना तत्काळ धामणगाव रेल्वे येथील ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आले. परंतु जास्त जखमी असल्यामुळे त्यांना तेथुन रात्री अमरावती येथील रेडीयंट हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले. सद्या त्यांच्यावर हॉस्पीटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.