अ.भा.ग्रा. पत्रकार संघाच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी युसुफ खान

0
923
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान.) 
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष व केंद्रीय सदस्य तथा वृत्तकेसरी, प्रतिदिन अखबारचे तालुका प्रतिनीधी युसुफ खान यासीन खान यांची अ. भा. पत्रकार संघाच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर निवड पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने यांनी २२ मे ला आयोजित बैठकीत केली.
अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ (महाराष्ट्र प्रदेश) केंद्रीय समीतीच्या मुख्य व्यवस्थापक मंडळाच्या पदाधिकार्‍यांची महत्वाची बैठक शिरजगाव (कसबा) येथे पत्रकार पतसंस्था व विदर्भ शेतकरी प्रोड्युसर कंपनी च्या सभागृहात घेण्यात येऊन त्यात महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, उपाध्यक्ष युसुफ खान, राजेंद्र भुरे, ज्ञानेश्वर बोराळकर, सरचिटणीस सुरेश सवळे, संघटक माणिकर ठाकरे, मानद सचिव अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासबाप्पु देशमुख, महिला संघटिका जयश्री पंडागरे, कोषाध्यक्ष अशोक याऊल, सदस्य मनोहर चरपे आदी पत्रकारांची उपस्थिती होती. याच दरम्यान चांदूर रेल्वेचे पत्रकार युसुफ खान यासीन खान यांची एकमताने केंद्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
युसुफ खान यांच्या निवडीबद्दल त्यांचे अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रवींद्र मेंढे, जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब सोरगिवकर, वसंतराव कुळकर्णी, उत्तमराव गावंडे, चांदूर रेल्वे तालुका अध्यक्ष राजेश सराफी, अमोल गवळी, धिरज नेवारे, विनय गोटफोडे, अमर घटारे, मनिष खुने, शहेजाद खान, मंगेश बोबडे, इरफान पठान, सचिन ढोके, मोहम्मद शकील, छगन जाधव, सुरज दहाट, रोशन भुरे, स्वप्नील उमप, हेमंत निखाडे यांसह अनेकांनी कौतुक केले आहे.