अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना सीबीआयकडून झालेली अटक निषेधार्ह ! – सनातन संस्था

0
853

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सीबीआयने हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि याच परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांना केलेली अटक निषेधार्ह आहे, असे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी प्रसारित केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, केंद्रात हिंदुत्वनिष्ठ शासन सत्तारूढ असतांना अधिवक्ता पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांना अटक होणे, यामागे षड्यंत्र आहे. सनातन संस्थेवर दबाव आणण्याच्या पुरोगाम्यांच्या मागणीपुढे सीबीआय झुकली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी भगवा आतंकवादाचा खोटेपणा ज्यांनी सिद्ध केला, ज्यांनी समाजाच्या हितासाठी अनेक याचिका प्रविष्ट केल्या, त्या अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक करणे गंभीर आहे. समाज, राष्ट्र आणि धर्म यांची निरपेक्षपणे सेवा करणारे अधिवक्ता पुनाळेकर निर्दोष आहेत, ही आमची भावना आहे. अधिवक्ता पुनाळेकर यांना देशभरातील समाजसेवक, देशभक्त, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि अधिवक्ते यांनी पाठिंबा कळवला आहे.

 

Photo – File