संभाजीनगरमध्ये धर्मांधांकडून अंडी फेकून श्री कर्णेश्‍वर महादेव मंदिराची विटंबना

674

संभाजीनगर –

धर्मांधांनी २४ मे या दिवशी पहाटे ३ वाजता अंडी फेकून सिडको आविष्कार वसाहतीतील श्री कर्णेश्‍वर महादेव मंदिराची विटंबना केली. हिंदुत्वनिष्ठ नागरिकांनी संयमाची भूमिका घेतल्यामुळे अनर्थ टळला.  याप्रकरणी पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज कह्यात घेऊन अन्वेषणाला प्रारंभ केला आहे.

पहाटे ४ वाजता पुजारी मंदिरात आल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला. हिंदुत्वनिष्ठांनीही घटनास्थळी धाव घेत संताप व्यक्त केला. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करत संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर नागरिकांनी मंदिराची स्वच्छता केली. या वेळी पोलिसांनी धर्मांधांना लवकरात लवकर अटक करणार असल्याचे सांगितले.