२७ मे पासून गोव्यात होणार्‍या अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची माहिती देण्यासाठी नागपूर येथे पत्रकार परिषद !

0
562
Google search engine
Google search engine

डावीकडून श्री. अतुल अर्वेन्ला, श्री. श्रीकांत पिसोळकर आणि सौ. नम्रता शास्त्री

 

नागपूर – हिंदु समाजाला त्याच्या शक्तीची जाणीव करून देऊन संघटितपणे हिंदु राष्ट्र साकार करण्यासाठी कृतीची पुढील दिशा ठरवणे आवश्यक आहे; म्हणूनच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोव्यात यावर्षीही २७ मे ते ८ जून या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अधिवेशनाची माहिती देण्यासाठी २१ मे या दिवशी टिळक पत्रकार भवन येथे आयोजित परिषदेला ते संबोधित करत होते. या पत्रकार परिषदेस हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला आणि सनातन संस्थेच्या सौ. नम्रता शास्त्री उपस्थित होत्या.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी सांगितलेे, ‘‘मागील ७ राष्ट्रीय अधिवेशनांत निश्‍चित झाल्यानुसार विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये शबरीमला मंदिरातील महिला प्रवेश, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या हिंदूंना नागरिकत्व मिळावे, शासनाने अधिग्रहित केलेल्या मंदिरांमधील भ्रष्टाचार या, तसेच अन्य विषयांवर आंदोलने करण्यात आली, तर आपल्या विदर्भातील स्थानिक संघटनांचे संघटन करण्यासाठी ४ प्रांतीय हिंदू अधिवेशनांचे आयोजन अकोला येथे करण्यात आले. याच कार्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न या आठव्या अधिवेशनाद्वारे होईल.

या अधिवेशनाला विदर्भातून हिंदू क्रांती सेना, राष्ट्रीय श्रीराम सेना, विद्यार्थी सेना, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, देवस्थान सेवा समिती – विदर्भ, श्रीराम सेना, शिवधारा आश्रम, तसेच वारकरी साहित्य परिषद, श्री संत गुलाबराव महाराज सेवा संस्था अशा विविध संघटनांचे ५४ हिंद्ुत्वनिष्ठ, अधिवक्ते आणि उद्योगपती सहभागी होतील.