भाजपमध्ये विजयी झालेला एकतरी उमेदवार मुसलमान आहे का ? – असदुद्दीन ओवैसी

0
481
Google search engine
Google search engine

भाग्यनगर – ‘देशात अल्पसंख्य दहशतीखाली जगत आहेत’, असे जर पंतप्रधानांना वाटत असेल, तर मग ते अशा लोकांचा (दहशत निर्माण करणार्‍यांचा) बंदोबस्त करतील का ? जे गायींच्या नावावर मुसलमानांना मारतात, त्याचे व्हिडीओ बनवून आम्हाला न्यून लेखतात, त्यांचा बंदोबस्त करा. भाजपच्या ३०३ खासदारांपैकी किती खासदार मुसलमान आहेत ?

भाजपचा एकतरी विजयी खासदार मुसलमान आहे का ? पंतप्रधानांचे वक्तव्य हा खोटारडेपणा आणि विरोधाभास आहे. मागील ५ वर्षांपासून पंतप्रधानांसह त्यांचा पक्ष हा खोटारडेपणा करत आला आहे, अशी टीका एम्आयएम्चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.