कॅप्टन सुनील डोबाळे यांचा आज सेवापुर्ती गौरव सोहळा-विविध संस्था संघटनांच्या वतीने सत्काराचे आयोजन

0
606
Google search engine
Google search engine

आकोट ता.प्रतीनीधी  :-

 

भारतीय सशस्त्र सेनेमधे ३३ वर्षाहून अधिक सेवा करून नुकतेच निवृत्त झालेले,मुळचे आकोटचे असणारे कॅप्टन सुनील डोबाळे यांचा भव्य नागरी सत्कार ताजनापूर येथे आज मंगळवार दि. २८ रोजी सायंकाळी ८ वा.पार पडणार आहे.हा सोहळा गावकरी मंडळी तथा विविध संस्था संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.ताजनापुर सारख्या छोट्या गावातुन सैन्य सेवेत विविध देशांना भेट देणाऱ्या कॅप्टन सुनील डोबाळे यांनी सेनेमधे उच्चपदावर दिलेली सेवा ही तालुका वासीयांसाठी गौरवाची बाब आहे.सैन्य सेवेत असताना त्यांनी सुमारे २९ देशांत भेटी दिल्या.आपल्या सैन्य सेवेत त्यांनी द.अफ्रीका,युगांडा,उरुग्वे,अॉस्ट्रेलीया,टांझानिया यासह विविध २९ देशात भेटी दिल्या. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सेवानिवृती पुर्वी नैनाकोट येथे झालेल्या मॕराॕथॉन मध्ये १० कीमी दौड मध्ये त्यांनी नेत्रदिपक कामगीरी केली होती.या गौरव सोहळ्याला आपली सैन्य सेवा देणारी अनेक अधीकारी तथा आजी माजी सैनिक यांची विशेष हजेरी असणार आहे.या गौरव सोहळ्यानिमित्त सप्तखंजेरीवादक संदीप पाल महाराज यांचा प्रबोधनपर कार्यक्रमाचा जागर आयोजित करण्यात आला आहे.

वह्राडच्या मातीतल्या या पुत्राच्या गौरव सोहळा कार्यक्रमाला बहुसंख्य नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक गावकरी तसेच मित्रमंडळाने केले आहे.