पालिकेचा कचरा प्रकल्पाला आग-चांदुर बाजार नगर परिषदेला केव्हा येणार जाग – गौरव भोवते 

0
1110
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार / विशेष प्रतिनिधी:-

दि. २६ ला नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात आग लागली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वायु, भु, जल प्रदुषण झाले संबंधित प्रकार हा दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडीस आला.
नगर परिषदेच्या घनकचरा विल्हेवाटीच्या ठिकाणी दुपारी १ वाजता धुर निघत असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली. कचरा विल्हेवाटीच्या प्रकल्पातुन येणाऱ्या धुरा मुळे बाजुलाच असलेला चांदुर बाजार – जसापुर मुख्य रस्त्यावरील वाहने दिसत नव्हते. त्यामुळे रस्त्यावर अपघातात होण्याची ही देखील संभावना होतीच.
नगर परिषदेला सामाजिक कार्यकर्ता गौरव भोवते यांनी वारंवार तक्रारी दिल्या. पेपरला याच समधी गेला ९ दिवसा पासून बातम्या पण येत असुनही नगर परिषद होणाऱ्या प्रदुषणाला कानाडोळा करीत आहे.
नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पा मध्ये आग विजवण्या करीता कुठलेही व्यवस्था केलीली नाही. मनुष्यबळ किंवा समंधीत प्रकल्पावर लक्ष ठेवण्या करीताही कोणी नसल्याने आग ही वाढतच होती व प्रकल्पाला वाल कंपाउंट नसल्याने आजु बाजूच्या शेतीला सुध्दा आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता. पण समंधीत प्रकार सामाजिक कार्यकर्ता गौरव भोवते यांना फोन व्दारे कळल्या मुळे त्यांनी त्वरीत घनकचरा प्रकल्प गाठुन पाहणी करुन नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविले व होणाऱ्या हानीस आटोक्यात आणण्यास मदत झाली.
गौरव भोवते यांनी झालेल्या हानीला नगरपरिषदेला जबाबदार असल्याचे मटले आहे व जाणीव पुर्वक त्यांनीच ही आग लावली असेही ते म्हणाले.