श्री संत चर्तुभुज महाराज बालसंस्कार शिबीराचा समारोप

0
557

आकोट/ संतोष विणके :-

तालुक्यातील श्री गजानन महाराज संस्थान देऊळगाव येथे श्री ज्ञानोबा तुकाराम श्री संत चर्तुभुज महाराज बालसंस्कार शिबीराचे आयोजन दिनांक 1 मे ते 20 मे 2019 पर्यंत करण्यात आले होते. हया निवासी शिबीरा मेध्ये 10 ते 20 वर्ष वयोगटातील 70 मुला मुलींनी सहभाग घेत शिबीर यशस्वी केले. शिबीरामध्ये प्रामुख्याने मुलांमुलीन मध्ये जीवन जगण्याची कला व हिंदु संस्कृतीची माहीती मिळावी त्या अनुशंगाने श्रीमद भागवत गिता, मृदंगवादन, हरिपाठ,पावल्या, ध्यान, प्रार्थना , हिंदु जन जागृती, गौरक्षणाचे महत्व्, धर्म संस्कृती, लाठीकाठी, कराटे,व वृक्षा रोपण इत्यादी विषयाचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शिबीराचे समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोरजी शेगोकार, प्रमुख अतिथी संजय बारोडे, श्री घुले, पुरुषोत्तम महाराज घोडीले, हभप पुरुषोत्तम महाराज मु-हेकार,हभप आनंद महाराज दुधाणे उपस्थीत होते.
अध्यक्षीय भाषणात शेगोकार यांनी जीवनात यशस्वी हाण्याकरीता चिकाटी, धैर्य, धाडस, सातत्य् तसेच अखंडता एकात्मता आवश्य्क असुन हया विषयी मार्गदर्शन केले. हया शिबीरामध्ये उत्कृष्ट् शिबीरार्थी म्हणुन प्रथम क्रमांक शिवाणी संतोष ठाकरे, व्दितीय क्रमांक उत्कर्ष परीक्षीत गावंडे, तृतीय क्रमांक सोपान प्रविण लांडे यांना मिळाला. शिबीराच्या यशस्वीते करीता योग प्रशीक्षक म्हणुन शिवाजी टोलमारे, संतोष सपकाळ , व्यवस्थापक गजानन दुधाट, मार्गदर्शक बापुरावजी महाराज काळे, विठठल महाराज साबळे, हभप श्रीधर महाराज तळोकार, ज्ञानेश्वर मुळे महाराज यांनी धुरा सांभाळली व सेवाधारी म्हणुन विनायक गावंडे, प्रमोदभाऊ पवार , हरीभाऊ मु-हेकार , रामचंद्रजी राऊत, श्रीकृष्ण मंगळे, संजुभाऊ काटोले, सौ सरस्वती ग. सावरकर, सौ सुशिलाबाई प्र. लांडे हयांनी अथक परीश्रम घेतले . कार्यक्रमाचे संचालन हभप रविंद्र महाराज काळमेघ यांनी केले तर आभार श्री पुरुषोत्त्म महाराज मु-हेकार यांनी केले.असे आयोजकांच्या वतीने कळवण्यात आले आहे.