नि:शुल्क उघोजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

0
573

अकोला/ प्रतिनिधी

जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवती व महिलांकरिता तसेच नव उद्योजकांकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अकोला द्वारा आयोजित अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता विशेष प्रोत्साहन योजने अंतर्गत एक महिना निशुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे सदर प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षणामध्ये उद्योजकीय गुण व्यक्तिमत्व विकास उद्योगा संबंधात मार्गदर्शन मार्केटिंग बँकेची सबसिडी योजनांची माहिती उद्योजकीय अडचणीचे निराकरण विविध परवाना उद्योग व्यवस्थापन आदी विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन लाभेल उद्योग निर्मितीसाठी इच्छुक असणाऱ्या प्रवर्गातील नवउद्योजकांना तसेच सुशिक्षित बेरोजगारांना युवक-युवती व महिलांकरिता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा हा प्रशिक्षणाचा हेतू आहे उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम 11 जून 2019 ते 10 जुलै 2019 पर्यंत या कालावधीत असेल तर त्याआधी अर्ज भरलेल्या इच्छुक उमेदवारांचा परिचय कार्यक्रम दिनांक 4 जून 2019 ला 11:30 वाजता श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे राहील.दि.०७/जून/२०१९ मुलाखतीला येताना मूळ कागदपत्रे टि.सी,मार्कलिस्ट,जात प्रमाणपत्र,आधार कार्ड,फोटो इत्यादी सोबत आणावे आणखी माहितीसाठी खालील संपर्क अनिल पाटील MCED प्रकल्प अधिकारी अकोला,वसुधा बडगे कार्यक्रम आयोजिका,विजय बेदरकर प्रकल्प अधिकारी अकोला जिल्हा समतादूत,(बार्टी)अकोला,समतादूत मनेश चोटमल,उपेंद्र गावंडे,बालाजी गिरी,वैशाली गवई,प्रज्ञा खंडारे,रवीना सोनकुसरे,विनोद सिरसाट यांच्याशी संपर्क साधून नोंदणी लवकरात लवकर करावी असे आवाहन महासंचालक कैलास कणसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी)पुणे,प्रज्ञा वाघमारे मुख्य प्रकल्प संचालिका समतादूत(बार्टी)पुणे,डॉ.अभिराम डबीर विभागीय अधिकारी अमरावती,निलेश निकम महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र अकोला यांनी संयुक्त पत्रका द्वारे केले आहे.
(अधिक माहितीसाठी संपर्क जिल्हा उद्योग केंद्र अकोला)