देवेन्द्र भुयार यांनी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व वरूडचे बीडीओ यांना बॉटल फेकून मारल्याची माहिती

0
3116
Google search engine
Google search engine

जिपचे कर्मचारी व अधिका-यांनी केला निषेध

अमरावती – येथील जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी आज जनरल मिटींग आयोजीत केली होती या मिटींगमध्ये जिपचे सदस्य अधिकारी वर्ग उपस्थित होता.मिटींगमध्ये पाणी टंचाई मुद्दा चांगला गाजला ज्याचे तोडफोडीत,फेकाफाकीत रूपांतर झाले. जिल्हा परिषदचे सदस्य श्री संजय गुलक्षे यांनी पाणी कनेक्शन 180 रू दराने प्रति व्यक्तीला दिल्या जाते ते 100 रू प्रति नुसार आकारावा अशी मागणी केली. व अधिकारी वर्गाने यावर लवकरच तोडगा काढु असे मिटींगमध्ये सांगीतले व त्यानंतर सत्तरगाव पाणी पुरवठा योजनेचा मुद्दा मांडण्यात आला यावरही तोडगाकाढु असं अधिकारी बोलत असतावेळी जिल्हा परिषदचे सदस्य देवेंद्र भुयार यांनी आक्रमक भुमिका घेवुन समोर ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या अधिका-यांना मारल्या ज्यात मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांचा सुद्धा समावेश आहे. यावेळी मोठा हंगामा याठिकाणी या दोन सदस्यांनी केला यांना आवर घालण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मात्र शेवटी पोलीस प्रशासनाला याची माहिती द्यावी लागली पोलीसांनी या हंगामेखोर दोन्ही सदस्यांना ताब्यात घेवुन गुन्हे दाखल केले आहे अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे