बारावीच्या परीक्षेत चांदूर रेल्वे तालुक्याचा ८६.१६ टक्के निकाल – मागिल वर्षीच्या तुलनेत अडीच टक्क्यांनी निकालात घट

0
610
Google search engine
Google search engine
३७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, तर ३७८ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण 
जि.प. विज्ञान महाविद्यालय, चांदूर रेल्वे (९८.२६ टक्के) तालुक्यातून प्रथम, तर खंडेराव देशमुख महाविद्यालय, राजुरा (९२.८५ टक्के) व्दितीय  
व्होकेशनल शाखेतून बेंडोजी बाबा एचएससी व्होकेशनल विद्यालय, घुईखेड (९२.८५ टक्के) अव्वल
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, अमरावती च्या वतीने घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेमध्ये यंदा चांदूर रेल्वे तालुक्याचा ८६.१६ टक्के निकाल लागला असून मागील वर्षीच्या निकालाच्या तुलनेत २.५८ टक्क्यांनी घट झाली आहे. मागिलवर्षी ८८.७४ टक्के निकाल लागला होता. ९८.२६ टक्के निकाल लावत जि.प. विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, चांदूर रेल्वेने तालुक्यातून अव्वल स्थान तर राजुरा येथील खंडेराव देशमुख महाविद्यालयाने ९२.८५ टक्के निकाल लावत तालुक्यातून व्दितीय स्थान मिळविले. तसेच एचएससी व्होकेशनल शाखेतून बेडोंजी बाबा महाविद्यालयाने मागिलवर्षी प्रमाणे यावर्षीही (९२.८५ टक्के) बाजी मारली.
बारावीच्या परीक्षेला चांदूर रेल्वे तालुक्यातून एकुण १ हजार ३०८  विद्यार्थी बसले. त्यापैकी १ हजार १२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ३७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ३७८ प्रथम श्रेणीत, तर ६४० व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. जि.प.विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, चांदूर रेल्वेचा ९८.२६ टक्के निकाल लागला असून ११३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व २ प्राविण्य श्रेणीत, ३८ प्रथम व ७१ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. या महाविद्यालयाचा मागिलवर्षी १०० टक्के निकाल होता व ११ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत होते. परंतु यावर्षी या जि.प. शाळेचा निकाल घसरला आहे. ज्युनिअर कॉलेज, पळसखेड चा निकाल ८७.१७ टक्के लागला असून कला शाखेतून ३८ पैकी २८ उत्तीर्ण असून १ प्राविण्य श्रेणीत, ५ प्रथम श्रेणीत व २१ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. तर वाणिज्य शाखेतून ४० पैकी ४० उत्तीर्ण, ५ प्राविण्य श्रेणीत व २० प्रथम, १४ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. खंडेराव देशमुख महाविद्यालय, राजुरा चा निकाल ९२.८५ टक्के
लागला असून कला शाखेतून ११२ पैकी १०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २ प्राविण्य श्रेणीत, ४९ प्रथम व ५१ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. राजर्षी शाहू विज्ञान व अतुल जगताप कला महाविद्यालय, चांदूर रेल्वेचा निकाल ९१.३० टक्के लागला असून विज्ञान शाखेतून ९२ पैकी ८९ विद्यार्थी उत्तीर्ण असून १ प्राविण्य श्रेणीत, १४ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. कला शाखेतून ४६ पैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण असून १ प्राविण्य व ४ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय, आमला विश्वेश्वरचा कला शाखेचा निकाल ८२.३५ टक्के असून ५१ पैकी ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यापैकी ७ विद्यार्थी प्रथम व ३३ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. तसेच आमला विश्वेश्वर येथील इंदिरा गांधी महाविद्यालयाचा निकाल ७१.८१ टक्के लागला. विज्ञान शाखेतून ३९ पैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतून ४५ पैकी २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर वाणिज्य शाखेतून २६ पैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ८ प्रथम तर ६२ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. बापुराव देशमुख महाविद्यालय, मांजरखेड कसबा चा निकाल ८७.१३ टक्के लागला असून विज्ञान शाखेतून ११४ पैकी १०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी १५ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. तर कला शाखेतून ५७ पैकी ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २ प्राविण्य श्रेणीत व ११ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. बापुसाहेब देशमुख महाविद्यालय, चांदूर रेल्वेचा कला शाखेचा निकाल ८८.१३ टक्के लागला. ५९ पैकी ५२ उत्तीर्ण झाले असून २ प्राविण्य श्रेणीत व ८ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. अशोक महाविद्यालय, चांदूर रेल्वेचा निकाल ९१.६६ टक्के लागला असून कला शाखेतून ४७ पैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण असून ५ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. तर वाणिज्य शाखेतून ४९ पैकी ४९ विद्यार्थी उत्तीर्ण असून ९ प्राविण्य श्रेणीत व २८ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय, मालखेड रेल्वेच्या निकाल ८६.७४ टक्के लागला असून कला शाखेतून ४४ पैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण, १५ प्रथम व १८ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. तर वाणिज्य शाखेतून ३९ पैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण असून ८ प्राविण्य, १५ प्रथम व १५ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. बेंडोजी बाबा कनिष्ठ महाविद्यालय, घुईखेडचा कला शाखेचा निकाल ८४.२१ टक्के असून ३८ पैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण व प्राविण्य श्रेणीत २, प्रथम व व्दितीय श्रेणीत प्रत्येकी १५ उत्तीर्ण झाले आहे. तसेच एचएससी व्होकेशनल शाखेचा घुईखेड महाविद्यालयाचाच निकाल ९२.८५ टक्के लागला असून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान या शाखेने मिळविला आहे. तर आमला विश्वेश्वर येथील श्रीकृष्ण महाविद्यालयाच्या एचएससी व्होकेशनलचा निकाल ७२.१५ टक्के लागला आहे. खंडेराव देशमुख महाविद्यालय, राजुराच्या एचएससी व्होकेशनलचा निकाल ७१.२१ टक्के व ज्युनिअर कॉलेज, पळसखेडचा एचएससी व्होकेशनलचा निकाल ७८.५७ टक्के लागला आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यात मुलींची बाजी
बारावीच्या परिक्षेत चांदूर रेल्वे तालुक्यातील  मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ७९.८९ असुन मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९३.९१ एवढी आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह चांदूर रेल्वे तालुक्यात सुध्दा मुलींचेच वर्चस्व पहावयास मिळाले.