परळी येथे दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे रविवारी ना. पंकजाताई मुंडे व सलमान खुर्शीद यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन

208

बीड नितीन ढाकणे:
परळी शहराला शैक्षणिक ओळख मिळवून देणाऱ्या किरणकुमार गित्ते आणि सौ. उषाताई किरणकुमार गित्ते यांनी शैक्षणिक क्षेत्रात नवा पॅटर्न निर्माण करून याला गित्ते पॅटर्न असे नाव मिळाले आहे. गेल्या चार वर्षांमध्ये परळी शहराचा शैक्षणिक स्तर उंचावला आहे. या भागातली सर्वसामान्यांची मुलं शिक्षणामध्ये पुढे आली आहेत. तर किरण गित्ते आय.ए.एस. ऍकॅडमीच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना शासकीय नौकरीमध्ये स्थान मिळाले आहे. परळी शहराची ओळख नव्या स्वरुपात करण्याचा प्रयत्न गित्ते दाम्पत्याने केला आहे. त्यांच्या संकल्पनेतील नवा उपक्रम म्हणजे दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचा शुभारंभ, रविवार, दि. 2 जून रोजी दुपारी 4 वाजता होत असून याचा शुभारंभ ना. पंकजाताई मुंंडे यांच्या हस्ते तर माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे प्राचार्य तेजेसकुमार यांनी केले आहे.
परळी शहराची ओळख निश्चितच वेगळी होती. परंतु काळानुरूप माणसं येतात आणि जातात परंतु काही माणसं आपल्या मायभूमीसाठी वेगळं काहीतरी करू इच्छितात आणि त्यातून वेगळं काही तरी परंतु जे समाजासाठी, परिसरासाठी, आपल्या माणसांसाठी हिताचे आणि त्याच्या सुखकारक भविष्याचे असले पाहिजे या भूमिकेतून वेगळे काम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आपल्या भागातील तरूण पोरांसमोर अनेक प्रश्न आहेत. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि क्लिष्ट प्रश्न म्हणजे शासकीय नौकरी. माहितीअभावी तिथपर्यंत पोहचू शकत नाहीत. त्याची कारणं आर्थिक क्षमता आणि मानसिक दुर्बलता आहे. त्यासोबतच संघर्षाची तयारी आहे परंतु नाही त्या ठिकाणी संघर्ष ओढवून घेण्याची निराशावादी भूमिका आहे. याला पर्याय म्हणून आयएएस अधिकारी असलेले किरणकुमार गित्ते यांनी परळी सारख्या शहरात किरण गित्ते आय.ए.एस ऍकॅडमी सुरू केली. ज्यातून ग्रामीण भागातील मुलं घडली पाहिजेत आणि पुढं गेली पाहिजेत. साधारणतः गेल्या चार वर्षाचा अनुभव लक्षात घेतला तर या ऍकॅडमीचे असंख्य विद्यार्थी हे चांगल्या ठिकाणी नौकरी करीत आहेत. त्यासोबतच आपल्या भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. केवळ पोकळ गप्पा आणि भव्यदिव्य इमारती यापेक्षा शिक्षणाचा नवा पॅटर्न निर्माण करण्याच्या भूमिकेतून दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलची शाळा परळी शहरात सुरू करण्याचा संकल्प केला. त्या संकल्पाची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. परंतु ही चांगली, प्रशस्त आणि परिपूर्ण इमारत उभी केली आहे. त्याचे उद्‌घाटन रविवार, दि. 2 जून रोजी दुपारी 4 वाजता परळी-बीड रोड असलेल्या तळेगाव, ता. परळी येथे होत आहे. याचे उद्‌घाटन जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होत असून या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद हे राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषाताई किरणकुमार गित्ते या राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थितीमध्ये खा. डॉ. प्रीतमताई मुंडे, अमरावतीच्या नवनिर्वाचित खा. नवनीत कौर राणा, दिल्ली वर्ल्ड फाऊंडेशनचे अध्यक्ष लुईस खुर्शीद, त्रिपुराचे नगरविकास व उद्योग विभागाचे सचिव किरणकुमार गित्ते, आष्टीचे आ. सु़रेश धस, बडनेरा-अमरावतीचे आ. रवि राणा, माजलगावचे आ. आर. टी. देशमुख, केजच्या आ. प्रा. सौ. संगिताताई ठोंबरे, अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, बीड जि.प. चे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, बीडचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे, बीड जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परळी येथील दिल्ली वर्ल्ड स्कूलचे प्राचार्य तेजेसकुमार यांनी केले आहे.