राष्ट्रप्रेमी आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची त्वरित मुक्तता करा ! – सौ. अनुभूती टवलारे, हिंदु जनजागृती समिती

380
अमरावती: हिंदु जनजागृती समितीकडून २९ मे यादिवशी सायंकाळी ६ वाजता राजकमल चौक येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन घेण्यात आले.मुंबई येथील राष्ट्रप्रेमी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी २५ मे या दिवशी अटक केली. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सध्या केंद्रीय अन्वेषण यंत्रणा करत आहे. या प्रकरणी गेल्या ३ वर्षांत सीबीआयने अनेक निरपराध हिंदूंना संशयित म्हणून अटक केली आहे. आता या प्रकरणी अधिवक्ता पुनाळेकर यांना १० मासांपूर्वी एका संशयित आरोपीने दिलेल्या जबाबावरून अटक करण्यात आल्याचे वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तातून समजत आहे.सीबीआयने केलेली ही कारवाई अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह आहे. या सर्व प्रकरणात सीबीआयचे वागणे, हे संशयास्पद आणि हिंदुत्ववाद्यांवर दबावतंत्र निर्माण करणारे आहे.हे सर्व हिंदुत्ववादी म्हणवणारे शासन सत्तेत असतांना होत आहे, हे आम्हा सर्व हिंदूंना धक्कादायक आहे. त्यांची तात्काळ मुक्तता करावी या मागणीसाठी हे आंदोलन घेण्यात आले.
     यावेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ.अनुभूती टवलारे यांनी आंदोलनाचा विस्तृत विषय सांगितला. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे जय देशमुख, रोशन मुळे, शुभम उमप,  आनंद डाऊ, अमोल जगदाळे, सौ. अरूणा बिंड, शबरी देशमुख, शुषमा पराते, पराग बिंड,प्रदीप गर्गे, गिरीष कोमेरवार , विलास पानसे,छाया टवलारे,आरती असोडिया, चंदा बागडे, अभय कडुकर,सुनीता देशमुख, जुगल किशोर ओझा, महेश लढके, विशाल चव्हाण, तुषार वानखडे, अभिषेक दीक्षित,विनोद सावरकर, श्याम पोकाळे, दुर्गा कडूकार,यांसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
जाहिरात