घुईखेड येथे भिषण पाणी टंचाई – आठ दिवसातून एक वेळा मिळते पाणी

0
622
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे भिषण पाणी टंचाई असुन आठ दिवसातुन एक वेळा पाणी मिळत आहे. त्यामुळे घुईख्ड वासीयांची भर उन्हाळ्यात पाण्याविना प्रचंड गैरसोय होत आहे.
   चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड हे गाव बेंबळा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने गेल्या १०-१२ वर्षापासून टँकरव्दारे पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा केला जात आहे. पाण्याच्या टाक्या असतांना पाईप लाईन मध्ये बिघाड व करोडो रूपयाचा भ्रष्टाचार झाल्याने नळ योजना बंद पडल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. आता नविन नळ कनेक्शन सामाजीक प्राधिकरण पाणी पुरवठा विभागाद्वारे जोडली जात आहे. ज्यांचे घरी नळ लावण्यात आले आहे, त्यांना सुध्दा पुरेपुर पाणी मिळत नाही. घुईखेड या गावाचे पुनर्वसन करतांना १५००  कुटूंब असलेल्या लोकवस्तीतील प्रकल्पग्रस्तांना ५० कोटी रूपये मिळाले. त्यापेक्षा डब्बल रक्कम घुईखेड या गावाच्या पाणी पुरवठा योजनेवर करण्यात आली. तरीही लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. लोकांचे तोंड पाहून पाणी दिल्या जात असल्याचा ही प्रकार गावात घडत असल्याचे समजते. तर अनेकांना पाण्याच्या तुटक पुरवठ्यामुळे ५-८ दिवस पाण्याची वाट पाहत राहावे लागते. पाण्यासाठी गरीब लोकांना मजुरी पाडून घरी थाबांवे लागते अवस्था झालेली आहे. तेव्हा बेंबळा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता यांनी तत्काळ आणखी पर्यायी व्यवस्था लावावी अन्यथा बेंबळा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिल वरघट यांनी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.