खा. ओमराजेंच्या हस्ते उस्मानाबादच्या सह्याद्री हाँस्पिटलमध्ये दुष्काळग्रस्त शेतकर्यांना दंत कवळीचे वाटप

126

उस्मानाबादजिल्ह्याची वाईट स्वरूपाची दुष्काळग्रस्त, अशी असलेली ओळख पुसण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू, प्रधानमंत्री नरंेद्र मोदी यांच्या कल्पनेतून देशस्तरावर लवकरच स्वतंत्र सिंचन मंत्रालय सुरू होणार आहे,त्याच्या माध्यमातून सिंचन योजना राबविण्यासाठी आपल्या जिल्ह्याला लाभ होईल, असा आशावाद नवनिर्वाचित खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला.

शहरातील सह्याद्री हॉस्पिटल्समध्ये खासदार ओमराजेंच्या हस्ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोफत दंत कवळीचे वाटप करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले,मतदारसंघातील जनतेने मोठ्या विश्वासाने मला निवडून दिले असून, दिवसरात्र एक करून त्यांच्यासाठी काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. निसर्गाचा असा प्रकोप कायम असून,यावर शाश्वत मार्ग काढण्यासाठी शासनाकडे आग्रह धरणार आहे. केंद्रात व राज्यात युतीची सत्ता असल्याने येणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसह बेरोजगारांसाठी कामे करण्याचा प्रयत्न करू.डॉ.कृष्णा उंदरेदेशमुख यांनी त्यांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांसाठी मोफत दंत कवळी देण्याचा कार्यक्रम घेतल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.यावेळी नगराध्यक्ष मकरंदराजे म्हणाले,मुलीच्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर असा अनोखा कार्यक्रम घेऊन डॉ.देशमुख यांनी समाजासमोर अादर्श निर्माण केला असून,त्यांचे कार्य अनुकरणीय अाहे.तत्पूर्वी, डॉ.दिग्गज दापकेदेशमुख,डॉ.कृष्णा देशमुख यांनी उपक्रमाबद्दल माहिती दिली.कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील,अॅड.अविनाश देशमुख, वसुधा दापकेदेशमुख, नगरसेवक सोमनाथ गुरव, नितीन शेरखाने, सुभाष शिंदे,नरसिंग उंदरेदेशमुख आदी उपस्थित होते

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।