सन्मानाची अपेक्षा न करता राष्ट्र-धर्मासाठी सर्वस्व समर्पित करण्याची हीच वेळ ! – प.पू. भागिरथीजी महाराज, संस्थापक अध्यक्ष, गुरुकृपा सेवा आश्रम, नागपूर.

94
रामनाथी (गोवा) –    ‘हिंदुत्वाचे कार्य करणारी एखादी संघटना मोठी आहे, पण त्यात संस्कृती नसेल, तर तिचे अस्तित्व असू शकत नाही. सनातन धर्म वाचला, तरच आपण वाचू शकतो. हिंदु जनजागृती समिती सनातन धर्माची माहिती सर्वांपर्यंत पोचवत आहे. सनातन संस्था ही मंदिरातील पवित्र मूर्तीसम आहे. ती हिंदु धर्मामध्ये प्राण भरण्याचे कार्य करत आहे. हनुमंताने कोणत्याही फळाची अपेक्षा न करता रामराज्यासाठी स्वत:ला समर्पित केले होते. वृक्ष निर्माण होण्यासाठी बिजाला त्याचे अस्तित्व संपवावे लागते. त्याप्रमाणे सन्मानाची अपेेक्षा न करता राष्ट्र-धर्मासाठी सर्वस्व समर्पित करायला हवे आणि ते करण्याची हीच वेळ आहे’, असे प्रतिपादन नागपूर येथील प.पू. भागिरथीजी महाराज यांनी अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित शेकडो हिंदुत्वनिष्ठांना संबोधित करतांना केले.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहू ! – अधिवक्ता रवींद्र घोष, अध्यक्ष, ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’, बांगलादेश

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणार्‍या ‘एबीपी माझा’चा निषेध आणि सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी !   
बांगलादेशात हिंदूंची स्थिती दयनीय असून हिंदु स्त्रियांवरील बलात्कार, हिंदूंच्या घरांची लुटालूट अथवा ती जाळणे, मंदिरांची तोडफोड अशा घटना तिथे आता नित्याच्या झाल्या आहेत. बांगलादेश निर्मितीच्या वेळी तेथे 18 ते 20 टक्के असलेली हिंदूंची लोकसंख्या अनेक प्रदेशांमध्ये 1 ते 8 टक्के इतकी घटली आहे. बांगलादेश सरकार हिंदूंच्या रक्षणासाठी निष्क्रीय आहे. भारत सरकारनेच आता स्वत:ची निष्क्रियता सोडून आम्हा बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेकडे लक्ष दिले पाहिजे. बांगलादेशमध्ये हिंदूंसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू, असे ठाम प्रतिपादन बांगलादेश येथील ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी केले. ते 30 मे या दिवशी श्री रामनाथ देवस्थानच्या श्री विद्याधिराज सभागृहात ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या दुसर्‍या दिवशी प्रथम सत्रात बोलत होते.
‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीला म्हणजे 28 मे या दिवशी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर – नायक कि खलनायक ?’ कार्यक्रमाचे आयोजन करून कोट्यवधी राष्ट्रभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनी ही ‘ज्यांनी प्रत्यक्ष देश तोडला, ते मोहनदास गांधी किंवा जवाहरलाल नेहरु’ यांच्या नावाने ‘नायक कि खलनायक ?’ असा कार्यक्रम ठेवण्याचे धाडस दाखवेल का ?, असा प्रश्‍न उपस्थित करून, भाजप सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देऊन त्यांच्या राष्ट्रभक्तीचा अन् मातृभूमीसाठीच्या असीम त्यागाचा सन्मान करावा, अशी मागणी अधिवेशनाच्या वतीने करण्यात आली.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।