गोंड समाज हा निसर्गपूजक समाज आहे….. पं.स. गटनेते रितेश अलमस्त

0
874

सिंदेवाही- आदिवासी समाज हा पूर्वी जंगलात वास्तव्याने राहात असल्याने या समाजाचा उदरनिर्वाह जंगलातील कंदमुळे खावून होत होता. आजचा गोंड समाज पौराणिक परंपरेनुसार निसर्गाची म्हणजे मोहाच्या झाडाची पूजा करतात. त्यामुळे गोंड समाज हा निसर्गपूजक समाज आहे, असे प्रतिपादन पं.स. गटनेते रितेश अलमस्त यांनी केले. खातगाव येथे सल्ला शक्तीच्या अनावरणप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घनश्याम पेंदाम, उद्घाटक म्हणून नानाजी जुमनाके तर प्रमुख अतिथी म्हणून प्रवीण येरमे, सरपंच नामदेव वरखडवार, मनोहर आत्राम, दुगाराम नेवारे, उपसरपंच अस्मीता नेवारे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात घनश्याम पेंदाम म्हणाले, गोंडी धर्माच्या संस्कृतीने सर्व जातींना संस्कृती शिकविली. सर्वप्रथम गोंडी जातीचा उगम होऊन गोंड समाजच शिक्षणापासून दूर राहिला. समाजात अशिक्षितपणा व एकसंघ नसल्याने समाजाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे शिक्षण घेणे काळाची गरज आहे. एकसंघ होऊन समाजातील चालीरिती, रुढी-परंपरा, भाषा यांचे अवलोकन करणे गरजेचे असल्याचेही पेंदाम म्हणाले. यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक रुपाली सुरपाम यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी गावात फेरी काढून सल्लाशक्ती पीठाचे अनावरण व ध्वजारोहण करून करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी संस्कृतीतील वेशभूषा करून नृत्य सादर करण्यात आले. यशस्वीतेसाठी वामन जुमनाके, राजू वरखडे, अशोक जुमनाके, अंबादास मेश्राम, खातगाव येथील आदिवासी बांधवांनी सहकार्य केले. संचालन मुर्लीधर मडावी यांनी तर आभार रवी तोडासे यांनी मानले.