आदर्श सरपंच पुरस्काराने गडमौशी ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन नाडमवार सन्मानीत

0
571
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गडमौशी ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन नाडमवार यांना आदर्श सरपंच म्हणून गौरविण्यात आले. .

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य तालुका संगमनेर जि. अहमदनगर यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. भूमाता ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या हस्ते सरपंच सचिन बबनराव नाडमवार यांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सिंदेवाही तालुका सरपंच, मित्रपरिवार यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.