कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे विश्व तंबाखू निषेध दिन संपन्न

0
478
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे दि. ३१ मे २०१९ ला विश्व तंबाखू निषेध दिन साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्ही. जी. नागदेवते कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही हे होते तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हनुन डॉ. पी. एन. बदनोरे, सेवानिवृत्त अधिकारी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही हे होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. व्ही. एन. सिडाम यांनी विश्व तंबाखू निषेध दिनाची शपथ घेउन झाली. या कार्यक्रमात डॉ. बदनोरे यानी तंबाखूमुळे होणारे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम यावर प्रमुख मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. के. जी. मांडवडे शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यांनी केले तसेच सदर कार्यक्रमात डॉ. सोनाली लोखंडे शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र, आणि प्रा. स्नेहा वेलादे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मार्गदर्शन डॉ. व्ही. जी. नागदेवते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किरण मांडवडे यानी केले तर आभार प्रदर्शन  डॉ. व्ही. एन. सिडाम यांनी केले. या कार्यक्रमासाठी शेतकरी व कृषी विस्तार सेवा विक्रेंत्याकरीता पदविका अभ्यासक्रमाचे ख़त विक्रेते उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता श्री. एन. डी. बारसागडे, श्री. एस. एन. पवार, व्ही. जी. माने आणि आशीष नेताम यांनी मोलाचे सहकार्य केले.